पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना फेटा बांधायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आम्ही मात्र सीमाप्रश्न सोडवल्यांनतर शहांना भगवा फेटा बांधणार आहोत असे मत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर झालेल्या बैठकीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सीमावाद मुद्यांवर आयपीएस अधिकारीची नेमणुक करण्यात येणार आहे, मात्र ते कोणत्या राज्याचे असतील हा प्रश्न आहे. बेळगाव जर केंद्र शासित झाला तर आम्हाला आनंदच आहे. बेळगावातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात यायचे आहे. मराठी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहीजे असं मत राऊत यांनी व्यक्त केले.
सीमाभागातील कर्नाटक पोलिसांनी मागे हटावे असे अवाहन देखील यावेळी राऊत यांनी केले. फेक ट्विटवरुन गोंधळ झाल्याचे बोम्मईंना आता समजले आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. दरम्यान ते असंही म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यासमोरही टीका केली आहे.
हेही वाचा