

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील किन्हीराजा येथील विज उपकेंद्रातील यंञचालक विजेचा शॉक लागून जखमी झाल्याची घटनी घडली. बुधवारी (दि. १४) ही घटना घडली.
याबाबत अधिक माहितीनुसार, किन्हीराजा येथील विज उपकेंद्रात मागील काही वर्षांपासून कनिष्ठ यंञचालक शरद रामटेके हे कार्य करीत आहेत. बुधवारी सकाळी ते ११ वाजेच्या दरम्यान यार्डमध्ये विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले असता यांना विजेचा जबरदस्त शाॅक लागला. यार्डमध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला यंञचालक रामटेके हे यार्डजवळ पडलेल्या स्थिति दिसून आले. याबाबत माहीती मिळताच सर्वच कर्मचाऱ्यांनी यार्डकडे धाव घेतली. वीजेच्या शाॅकने गंभीर जखमी झालेले शरद रामटेके यांना स्थानिक आरोग्य वर्धिनी येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर अमरावती येथे त्यांना नेण्यात आले.
यापूर्वीही दि. २२ नोव्हेबरला कर्मचारी गोपाल हरणे यांना देखील काम करीत असताना अचानक विजेचा शाॅक बसला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. हरणे यांचेवर अजूनही वाशीम येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विज उपकेंद्रातून वीजपूरवठा बंद असताना ही गोपाल हरणे यांना विजेचा शाॅक लागला होता. व आजही काही तसाच प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला २० दिवसांचा कालावधी होऊन ही आता पर्यंत कोणतेही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सदरील अपघाताची साधी चौकशी ही करण्यात आली नाही. त जबाबदार कोण? याचा शोध घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.