Job News Ghost Hirring pudhari
फीचर्स

Job News Ghost Hirring: सावधान! १० पैकी ४ कंपन्या काढतात 'फेक' नोकऱ्या... घोस्ट हायरिंग म्हणजे काय, त्यापासून कसं वाचायचं?

Anirudha Sankpal

Job News Ghost Hirring: जॉब मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम सुरू झाला आहे. २०२४ मध्ये भारतात अनेक कंपन्यांनी फेक जॉब पोस्टिंग सुरू केलं आहे. यामुळं नोकरी शोधणाऱ्या होतकरू तरूणांना वास्तवात नोकरीची संधीच मिळत नाहीये. CNBC ने दिलेल्या रिपोर्टनुसार १० पैकी ४ कंपन्या या घोस्ट हायरिंग करत आहेत. हे घोस्ट हायरिंग टॅलेंट पाईपलाईन, ग्रोथ आणि डाटा मॅपिंगसाठी केलं जातं. कंपन्या फक्त दिखावा करण्यासाठी अशा प्रकारच्या व्हेकन्सी काढत असते. या अशा घोस्ट हायरिंग शोधण्याच्या तीन पद्धती आहेत.

आजकाल नोकरी शोधणारे तरूण हे एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकत आहेत. ते सतत चांगल्या नोकरीसाठी अर्ज करतात. या जॉबचे डिस्क्रिप्शन जबरदस्त असते. मात्र पुढे प्रोसेस केलं की काही होत नाही. नोकरीची जाहिरात आणि प्रत्यक्ष हायरिगं यांच्यातील दरीने नव्या घोस्ट हायरिंग संकल्पनेला जन्म दिली आहे.

सीएनबीसीच्या रिपोर्टमध्ये काय?

सीएनबीसीच्या एका रिपोर्टनुसार २०२४ या वर्षात १० पैकी ४ कंपन्यांनी फेक जॉब पोस्टिंग केलं होतं. सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला देखील १० पैकी ३ कंपन्या अशा नोकऱ्यांच्या जारिहाती देत आहेत ज्या अस्तित्वातच नाहीयेत. अनेक नोकरी शोधणारे तरूण तरूणी या जॉबसाठी अर्ज करतात मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. यामुळं ते हैराण होतात. त्यामुळं कंपन्या खरोखरच नोकर भरती करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो.

कंपन्या असं का करतात?

याबाबत ऑर्गनाईजेशनल सायकॉलॉजिस्ट गुरलीन बरूआ यांनी एका माध्यम समुहाशी बोलताना सांगितलं की, कंपन्या घोस्ट जॉब पोस्ट करण्याची अनेक कारणे आहेत. यातील काही कराणे पुढीलप्रमाणे...

टॅलेंट पाईपलाईन- भविष्यातील गरजेनुसार उमेदवारांचा डेटा कलेक्ट करणे

ग्रोथचा दिखावा - गुंतवणूकदारांना कंपनी वेगानं वाढत आहे असा संकेत देण्यासाठी

डाटा मॅपिंग - नोकरीसाठी आलेल्या अर्जाद्वारे मार्केट ट्रेंड्स आणि टॅलेंटची माहिती एकत्र करणे

फेक किंवा घोस्ट हायरिंग कसं ओळखायचं?

तुम्ही देखील जॉब पोर्टलवर अर्ज करून थकला असाल तर काही संकेतांवर लक्ष द्या. जसं की जॉब व्हेकन्सी जाहिरातीच्या पोस्टिंगची तारीख चेक करता जर एखादे पद एका महिन्यापेक्षा जास्त काळ खुलं आहे आणि त्यासाठी सारखी सारखी जाहिरात केली जात आहे तर कंपनी हायरिंग करत नसल्याची शक्यता आहे.

ऑफिशिअर करिअय पेज

जर एखादी नोकरी लिंक्डइन किंवा इतर जॉब पोर्टलवर दिसत असेल मात्र त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील करिअर पेजवर दिसत नसेल तर सावधान वाहा.

थेट संपर्क

हायरिंग मॅनेजर किंवा एचआरसे लिंक्डइनवर थेट संपर्क करण्याचा प्रयत्न करा. जर तिथून काही स्पष्ट उत्तर मिळत नसेल तर समजून जा की दाल में कुछ तो काला हैं...

काळ बदलतोय काय करायला हवं?

गुरलीन बरूआ यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवाराने ज्या गोष्टी त्याच्या नियंत्रणात आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. AI चा प्रभाव समजून घेऊन प्रॉब्लेम सॉल्विंग स्कील्स विकसीत केले पाहिजेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार तांत्रिक काम जसजसं ऑटोमेटेड होत आहे तसतसे क्रिटिकल थिंकिंग, इमोशनल इंटेलिजन्स आणि लवचीकता या मानवी गुणांना अत्यंत डिमांड येणार आहे.

हायरिंगवेळी पारदर्शकता गरजेची

कंपन्यांनी आपले कम्युनिकेशन स्पष्ट ठेवलं पाहिजे. ते जरी पूर्णपणे पारदर्शी नसले तरी त्यांनी हे पद त्वरित भरले जाणार आहे की नाही याची माहिती देण्यात यावी, ते भविष्यातील पाईपलाईन तयार करत आहेत का हे देखील स्पष्ट केलं पाहिजे. दिखाव्यासाठी जॉब पोस्ट करणं म्हणजे उमेदवाराचा विश्वासघात करण्यासारखं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT