Kim Jong Un News: हुकूमशहा किम जाँग उनसाठी पैसे कमावणारी 'फेक वर्कर आर्मी'; आयटीत नोकरी...AI चा असा केला जातोय वापर

Kim Jong Un Secret Army: किम जाँगच्या 'सिक्रेट आर्मी'तले सदस्य चक्क आयटी विश्वाातील बड्या टेक कंपन्यात नोकरी करत आहेत.
Kim Jong Un
Kim Jong UnPudhari
Published on
Updated on

Kim Jong Un North korea fraudulent remote IT workers

लंडन : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उनने अमेरिकेनंतर आता युरोपकडे आपला मोर्चा वळवला आहे. किम जाँगच्या 'सिक्रेट आर्मी'तले सदस्य चक्क आयटी विश्वाातील बड्या टेक कंपन्यात नोकरी करत आहेत. या नोकरीसाठी मिळणारा पगार हा उत्तर कोरियाच्या तिजोरीत जमा केला जात असून या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांमधील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

अमेरिकेतील पॅटर्न युरोपमध्ये

किम जाँग उनसाठी काम करणारी टीम “फेक वर्कर” म्हणून कंपन्यामध्ये जाते. काही लोक पूर्ण वेळ कर्मचारी तर काही जण 'फ्रिलान्स' काम घेतात. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 ते 2024 दरम्यान उत्तर कोरियन हस्तकांनी 300 हून अधिक अमेरिकन कंपन्यांमध्ये घुसखोरी केल्याचे उघडकीस आले होते.

बीबीसीच्या 2025 मधील वृत्तानुसार उत्तर कोरियाच्या या 'फेक वर्कर्स'नी किमान 250 दशलक्ष डॉलर्स (2300 कोटी रुपये) कमाई केली. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आल्यानंतर उत्तर कोरियाने आता युरोपमधील कंपन्यांमध्ये हातपाय पसरवण्यास सुरूवात केल्याचा अंदाज सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

उत्तर कोरियावरील निर्बंधांमुळे पैशांची चणचण

गेली कित्येक वर्ष उत्तर कोरियावर निर्बंध लादण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत तिजोरीत पैसे जमा होत रहावे यासाठी उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने शक्कल लढवली. उत्तर कोरियातील मुलांना रोजगाराच्या नावाखाली अमेरिकेसारख्या देशात पाठवले जाते. ओळख लपवण्यासाठी त्यांना बनावट कागदपत्रे दिली जातात. उत्तर कोरियाऐवजी दुसऱ्या देशाचे नागरिक असल्याचे कागदपत्रे सादर करुन ती लोक बड्या आयटी कंपनीत नोकरीला लागतात आणि मग त्या तरुणांना मिळणाऱ्या पगारातील 85 टक्के रक्कम ही उत्तर कोरिया सरकारच्या तिजोरीत जमा होते, असा दावा बीबीसीच्या वृत्तात करण्यात आलाय. तर काही ठिकाणी वेगळा पॅटर्न दिसून आला होता.

युरोपकडे मोर्चा का वळवला?
उत्तर कोरियाच्या 'फेक वर्कर आर्मी'त काम केलेल्या तरुणाने ऑगस्ट 2025 मध्ये बीबीसीला मुलाखत दिली होती. तो म्हणतो, अमेरिकेपेक्षा युरोपमध्ये लोक सहज सरकारी कागदपत्रे द्यायला तयार होतात.

AI चा वापर कसा केला जातो?

कोणत्याही खासगी कंपनीच्या भरती प्रक्रियेत सहसा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने बघितले जात नाही. एचआर विभागातील याच त्रुटींचा फायदा उत्तर कोरिया घेत आहे. बोगस लिंक्डइन अकाऊंट उघडणे किंवा अकाऊंट हॅक करुन नोकरी मिळवण्याचे प्रकार सर्रास घडतात. पण आता तर एआयचा वापर करुन डिजिटल अवतार, डीपफेक व्हिडिओच्या आधारे कंपन्यांची फसवणूक केली जाते. 'एआय'चा वापर ही टीम विश्वासार्हता वाढवण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. एका रिक्रूटरने उमेदवार एआय वापरुन मुलाखत देत असल्याचे निदर्शनास आल्याचे मान्य केले. तो उमेदवार उत्तर कोरियाचा होता.

एआयद्वारे स्थानिक संस्कृतीशी जुळणारी नावे, ईमेल आयडी तयार केली जातात. इतकंच नव्हे तर संवाद शैलीही विकसित केली जाते. त्याामुळे संपूर्ण प्रक्रियेत एचआर विभागाला कोणताही 'रेड फ्लॅग' निदर्शनास येत नाही.

कंपन्यांनी नियमावली कठोर केल्यावर दुसरा पर्याय

टेक कंपन्यांनी ही घुसखोरी रोखण्यासाठी भरती प्रक्रिया 'कठोर' केल्यानंतर उत्तर कोरियाच्या हस्तकांनी नवा मार्गही शोधला आहे. ‘एखाद्या व्यक्तीला पैसे देऊन मुलाखतीसाठी पाठवले जाते. निवड झाल्यास कंपनीकडून दिला जाणारा लॅपटॉप हस्तक स्वत:च्या ताब्यात घेतात किंवा त्या लॅपटॉपचा Access घेऊन काम सुरू करतात. हे हस्तक अशा पद्धतीने दोन ते तीन कंपन्यांमध्ये काम करत असल्याचेही उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news