Nokia Layoff: नोकिया तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार! भारतीय कर्मचारीही होणार बेरोजगार; कारण काय?

एकेकाळी जगातील सर्वात मोठी फोन उत्पादक असलेली 'नोकिया' कंपनीने आपल्या मनुष्यबळात मोठी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. काय आहेत कारणे? जाणून घ्या सविस्तर
Nokia Layoff
Nokia Layofffile photo
Published on
Updated on

Nokia Layoffs:

नवी दिल्ली: एकेकाळी जगातील सर्वात मोठी फोन उत्पादक असलेली 'नोकिया' कंपनीने आपल्या मनुष्यबळात मोठी कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. जगभरातील तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असून, याचा मोठा परिणाम नोकियाच्या भारतीय कर्मचाऱ्यांवरीही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक स्तरावर २० टक्के कपात

'मनीकंट्रोल'च्या वृत्तानुसार, नोकिया आपल्या एकूण जागतिक कर्मचारी संख्येत २० टक्क्यांनी घट करणार आहे. सध्या कंपनीत ७४,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. भारतात नोकियाच्या कर्मचाऱ्यांची संख्या १७,००० च्या वर आहे. ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या बड्या टेक कंपन्यांच्या कर्मचारी कपातीनंतर आता नोकियानेही हा कठोर निर्णय घेतल्याने तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Nokia Layoff
Amazon India Zero Referral Fee: ॲमेझॉन इंडियाचा विक्रेत्यांसाठी मोठा दिलासा; झिरो रेफरल फी लागू

भारतातील विक्रीत मोठी घसरण

नोकियाची भारतातील कामगिरी खालावली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०२५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री १५ टक्क्यांनी घसरून सुमारे ४,२९० कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही विक्री सुमारे ५,००० कोटी रुपये इतकी होती. ही घट कर्मचारी कपातीचे मुख्य कारण मानले जात आहे.

नोकियाने भारतातील आपल्या नेतृत्वातही मोठे बदल केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून समर मित्तल यांची 'इंडिया कंट्री बिझनेस लीडर' तर विभा मेहरा यांची 'इंडिया कंट्री मॅनेजर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे माजी प्रमुख तरुण छाबडा यांनी या बदलांच्या पार्श्वभूमीवर आपले पद सोडले आहे. नवीन रचनेनुसार, समर मित्तल यांच्याकडे संपूर्ण ग्राहक पोर्टफोलिओची जबाबदारी असेल, ज्यामध्ये त्यांना पूर्वीच्या प्रमुखांपेक्षा अधिक कार्यात्मक अधिकार देण्यात आले आहेत.

का होणार नोकरी कपात?

नोकियाच्या क्लाउड आणि नेटवर्क सर्व्हिसेसचे 'मोबाईल नेटवर्क'मध्ये २०२३ मध्ये विलीनीकरण झाले होते. या विलीनीकरणामुळे अनेक पदांची पुनरावृत्ती झाली असून, ती पदे आता कमी केली जाणार आहेत. याशिवाय युरोपमधील ग्रीस, इटली, जर्मनी आणि फ्रान्स या देशांतील साधारण १,४०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही टांगती तलवार आहे.

८ वर्षांत ३० हजार कर्मचारी कमी

गेल्या आठ वर्षांत नोकियाच्या कर्मचारी संख्येत सातत्याने घट झाली आहे. २०१८ मध्ये कंपनीत सुमारे १,०३,००० कर्मचारी होते, जे आता ७४,१०० वर आले आहेत. नोकियाची दूरसंचार क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपनी 'एरिकसन' देखील आपल्या कर्मचारी संख्येत कपात करत आहे. या कंपनीने गेल्या वर्षी सुमारे ५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. आता आणखी कपात करण्याची शक्यता आहे.

Nokia Layoff
Final Salary: नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसांत पगार मिळणार; काय आहे नवीन नियम? कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news