Viral News Job Offer Rejects
Viral News Job Offer Rejectspudhari

Viral News Job Offer Rejects: सिनिअर पोस्ट अन् ४७ लाखांचं पॅकेज नाकारलं... वनेश माळीची नम्र नकाराची 'ती' पोस्ट चर्चेत

Published on

Pune Techie Rejects 47 Lakh Job Offer: पुण्यातील एका इंजिनिअरिंग मॅनेजरची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या टेकीने मुलाखतीत चांगली कामगिरी करत एक उच्च पगाराची नोकरी पटकावली होती. मात्र त्याने माझ्याकडे या जॉब प्रोफाईलसाठी गरजेचे असलेले स्कील नाहीत म्हणत या ऑफरवर पाणी सोडलं. वनेश माळी यांच्या या प्रामाणिक सोशल मीडिया पोस्टवर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी पुण्यातील एका कंपनीतील सिनिअर पोस्ट आणि वर्षाला ४७ लाखाचं पॅकेज नम्रपणे नाकारलं.

Viral News Job Offer Rejects
Rohit Pawar: कार्लोस नावाचा व्यक्ती कॅकपीटमध्ये जायचा... विम्याचा अँगल, अजित पवारांचं विमान मुद्दामून आदळलं; रोहित यांना शंका

माझ्याकडे स्कील्स नाहीत

वनेश माळी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितात, 'मला पुण्यात नुकतेच एक चांगली जॉबची संधी चालून आली होती. वर्षाला ४७ लाखांचे पॅकेज आणि सिनिअर रोलची ऑफर होती. पॅकेज चांगलं होतं. कंपनी देखील चांगली होती. मात्र या पदासाठी लागणारे स्कील्स माझ्याकडे अजून नाहीत.'

माळी पुढे लिहितात, 'मी नम्रपणे ही जॉब ऑफर नाकारली आणि मी ज्यांनी मला ही ऑफर दिली होती त्यांना मी या स्तरावर डिलिव्हर करण्यासठी अजून तयार नाही असं स्पष्टीकरण दिलं.

Viral News Job Offer Rejects
AI Summit RoboDog Controversy | गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका नेहा सिंह यांना 'वेझर'कडून नोकरीची मोठी ऑफर

चर्चांना ऊत

वनेश माळी यांच्या या सोशल मीडिया पोस्टनंतर चर्चांना ऊत आला आहे. काही युजर्सनी जर त्यांच्याकडे या नोकरासाठी लागणारे स्कील्स नव्हते तर मग त्यांने हा इंटरव्ह्यू कसा क्लिअर केला असे प्रश्न विचारले आहेत.

माळी म्हणाले की, 'त्यांनी याबाबत बेसिक प्रश्न विचारले. मात्र जॉब आणि जबाबदारी आणि पे रेंज विचारात घेता आम्हाला अजून डिलिव्हर करणं गरजेचं होतं. मी यावेळी जरा द्विधा मनःस्थितीत होतो. मी थोडी जोखीम घेण्याचा विचार करत होतो. मात्र मी बहुदा चूक करत होतो. त्यानंतर मी निर्णय घेतला.'

Viral News Job Offer Rejects
Shashi Tharoor son job loss: थरूरांच्या मुलाची नोकरी गेली.... वॉशिंग्टन पोस्टमध्ये मोठी कर्मचारी कपात

जॉब करताना स्कील्स शिकता आले असते

वनेश माळी यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे. त्यानंतर काही युजर्सनी वनेश माळी यांनी ही ऑफर स्विकारायला हवी होती असं मत नोंदवलं. तुम्ही या जॉबसाठीचे स्कील्स हे नोकरी करत असताना देखील शिकू शकला असता असं काहींनी मत व्यक्त केलं तर एक युजरने माळी यांच्या प्रमाणिकपणाचं कौतुक केलं.

एका युजरने माळी यांना विचारलं की, 'एक प्रामाणिक प्रश्न तुमच्या स्कील्सची कमतरता होती की तुम्हाला जॉब करतेवेळी हे स्कील्स आत्मसात करता येणार नाहीत असं वाटलं.? मला वाटतं की तुम्ही तो जॉब स्विकारायला हवा होता. स्कील्स काय ज्यावेळी त्यांची गरज असते त्यावेळी सहज शिकता येतात. जर वेळेचं कोणतं बंधन नसेल तर यासाठी थोडा अधिक वेळ लागू शकतो.'

Viral News Job Offer Rejects
Amazon Job Cut: अमेझॉन करणार तब्बल ३० हजार कर्मचारी कपात; येत्या आठवड्यात १४ हजार जणांना घरी जावं लागणार?

तुमच्याबद्दल खूप आदर

एका युजरने हा निर्णय घ्यायला खरोखरचा प्रामाणिकपणा आणि स्वतःबद्दलची खरी जाणीव असणं गरजेचं असतं. तुम्ही तयार नसताना ताज स्विकारण्यापेक्षा लाँग टर्म ग्रोथला प्राधान्य दिलं याचा आदर आहे.'

दुसऱ्याने एवढ्या मोठ्या पगाराची ऑफर नाकारण्यासाठी गट्स लागतात वनेश मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. अनेकांकडे पगारापेक्षा योग्यतेला प्राधान्य देण्याचं धाडस नसतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news