BYD Ultra Fast Charging: इलेक्ट्रिक कारचा बाजार सध्या चांगला वाढत आहे. मात्र अजूनही काही लोकं इलेक्ट्रिक गाडी चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या वेळावरून इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी घेण्यापासून पाय मागे खेचत आहेत. मात्र आता अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
चार्जिंगला लागणारा प्रचंड वेळ या समस्येवर BYD ने या समस्येवर तोडगा काढला आहे. चीनच्या कार निर्मिती कंपनी BYD ने नवीन फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी आणली असून. चार्जिंगच्या बाबतीत त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेला देखील आव्हान दिलं आहे. कंपनीचा दावा आहे की नव्या फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानामुळं एक इलेक्ट्रिक गाडी फक्त ५ मिनिटात चार्ज होणार आहे. तसंच एका चार्जमध्ये तवळपास ४०० किलोमीटर रेंज मिळणार आहे.
बिल्ड युअर ड्रीम अर्थात BYD ने नवीन टेक्नॉलॉजीचा एक रिअल वर्ल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात गाडी अत्यंत कमी काळात चार्च होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत BYD च्या फ्लॅगशिप सीदान Han L चार्ज होताना दाखवण्यात आली आहे. या क्लिपमध्ये ५ मिनिटात १० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांपर्यंत चार्ज होताना दाखवण्यात आली आहे.
या चार्जिंगवेळी चार्जिंग पॉवर ही ७४६ किलोवॅट पर्यंत पोहते., EV स्टँडर्डपेक्षा हे खूपच जास्त आहे. म्हणजे जवेढ्या वेळात तुम्ही तुमचा चहा पिता तेवढ्या वेळेत तुमची गाडी चार्च होत आहे.
या आश्चर्यकारक घटनेच्या मागं BYD चा नवा सुपर ई प्लॅटफॉर्म आहे. हा पॅसेंजर व्हेईकलच्या जगातील पहिला मास प्रोड्युस फूल डोमेन १००० V हाय व्होल्टेज आक्रिटेक्चर आहे. या प्लॅटफॉर्मसोबत कंपनीची नवी फ्लॅश चार्जिंग बॅटरी काम करत आहे. यात १००० एम्पियरपर्यंत चार्जिंग करंट आणि १० C चार्जिंग रेट सारखे रेकॉर्ड सेट करत आहे.
सुपर ई - प्लॅटफॉर्म आणि फ्लॅश चार्जिंग बॅटरीचे हे कॉम्बिनेशन मुळून १ मेगावॅट म्हणजे १००० किलोवॅट पर्यंतची चार्जिंग पॉवर देण्यास सक्षम आहे. याचा थेट फायदा हा या टेक्नॉलॉजीने युक्त असलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांना होणार आहे. या गाड्या फक्त ५ मिनिटात जवळपास ४०० किलोमीटर ची CLTC ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.
BYD चे म्हणणे आहे की त्यांनी या अल्ट्रा पॉवर चार्जिंगसाठी लागणारी नेक्स्ट जनरेशन ऑटोमेटिव्ह ग्रेड SiC पॉवर चीप स्वतः डेव्हलप केली आहे. याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील सुरू झालं आहे. या चीपचे व्होल्टेज रेटिंग १५०० V पर्यंत आहे. यामुळे ही इंडस्ट्रीचा पहिला मास प्रोड्युस्ट ऑटोमेटिव्ह ग्रेड SiC पॉवर चीप बनते. याची व्होल्टेज क्षमता सर्वाधिक मानली जात आहे.
BYD चे सीईओ वांग चुआनफू यांच्या म्हणण्यानुसार कंपनीचा चार्जिंग एन्झायटीला पूर्णपणे संपवणे हा उद्येश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार चार्जिंगला लागणाऱ्या वेळाची भीती ही आजही इव्ही खरेदी करण्यामध्ये मोठी बाधा निर्माण करत आहे. हाच विचार घेऊन Han L सीदान आणि Tang L एसयुव्ही सारखे मॉडेल्स या नव्या प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आल्या आहेत.
BYD ची योजना फक्त चीनपुरतीच मर्यादित नाहीये. कंपनीने या फ्लॅश चार्जिंग सिस्टमला युरोप आणि अन्य विदेशी मार्केटमध्ये देखील घेऊन जाणाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या मार्केटमध्ये हळूहळू १००० वॅट चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. जर हे तंत्रज्ञान जगभरात पसरलं तर इलेक्ट्रिक कारचे भविष्य पहिल्यापेक्षा अधिक वेगानं उज्वल होईल.