पुढारी वृत्तसेवा
नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी पुढील काही आठवडे खूपच रोमांचक असणार आहेत. कारण, बाजारात येत आहेत ६ जबरदस्त गाड्या!
यामध्ये अशा बहुप्रतिक्षित कार्सचा समावेश आहे, ज्यांची लोकं वाट पाहत आहेत. जर तुम्हीही नवीन कार घेणार असाल तर जरा थांबा.
कदाचित यापैकीच एक कार तुमच्या 'बाइंग लिस्ट' मध्ये समाविष्ट होईल!
१. टाटा सिएरा (Tata Sierra)
लॉन्च: २५ नोव्हेंबर
टाटाची ही बहुप्रतिक्षित एसयूव्ही आधी पेट्रोल-डिझेल (ICE) व्हर्जनमध्ये येईल. नंतर तिचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील सादर होईल.
२. किआ सेल्टोस (Kia Seltos - Gen 2)
लॉन्च: १० डिसेंबर
किआ सेल्टोसचे नवीन मॉडेल जागतिक स्तरावर लाँच होणार. लवकरच ती भारतीय बाजारात देखील दाखल होईल.
३. मारुती ई-विटारा (Maruti E-Vitara EV)
लॉन्च: डिसेंबर
मारुतीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे.
बॅटरी: ४९ kWh आणि ६१ kWh पॅक.
रेंज: ५०० किमी पेक्षा जास्त!
४. टाटा हॅरियर पेट्रोल (Tata Harrier Petrol)
लॉन्च: ९ डिसेंबर
आतापर्यंत फक्त डिझेलमध्ये उपलब्ध असलेली हॅरियर, आता पेट्रोल इंजिनसह येत आहे.
इंजिन: १.५ लीटर टर्बो-जीडीआय इंजिन.
५. टाटा सफारी पेट्रोल (Tata Safari Petrol)
लॉन्च: ९ डिसेंबर
हॅरियरसहच सफारी देखील याच १.५ लीटर पेट्रोल इंजिनसह लाँच होईल.
टाटाच्या या दोन्ही एसयूव्हीमध्ये पेट्रोलचा पर्याय मिळणार.
६. महिंद्रा ७-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही
लॉन्च: २७ नोव्हेंबर
महिंद्राची पहिली ७ सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही.
अपेक्षित रेंज: ५०० किमी पेक्षा जास्त!