ऑटोमोबाईल

Electric Car खरेदी केल्यास १० वर्षात १० लाखांची बचत

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Electric Car India : सामान्य माणसासाठी स्वतःची कार ही अजूनही एक खास गोष्ट आहे. मध्यमवर्गीय कुटुंब अनेक घटकांचा गुणाकार-भागाकार केल्यानंतर कार खरेदी करण्याचा निर्णय घेते. इलेक्ट्रिक वाहनांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच ही वाहने रस्त्यावर धावतानाही दिसत आहेत. वाहन उद्योगाचे हे भविष्य असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पारंपरिक पेट्रोल कारऐवजी इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही १० वर्षात सुमारे १० लाख रुपयांची बचत करू शकता.

सर्वात पहिला या गोष्टीची तुलना करुया की, खरेदीच्या किंमतीत काय फरक आहे? उदाहराणासाठी टाटा मोटर्सच्या नेक्सन (Tata Nexon) मॉडेलला समोर ठेऊया. हे कारचे मॉडेल पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. जर टाटा नेक्सनचे पेट्रोल मॉडेल मॉडेलकडे नजर टाकल्यास दिल्लीमध्ये याच्या ड्युअल टोन रूफ एएमटी मॉडेलची ऑन रोड किंमत १३.२२ लाख रुपयांच्या आस-पास आहे. तर टाटा नेक्सन ईवी (Tata Nexon EV) च्या बेसिक मॉडलची किंमत १४.७९ लाख रुपयांच्या जवळपास आहे.

टाटा नेक्सन EV वर सबसिडी : ४.३० लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते…

टाटाची नेक्सन इलेक्ट्रिक कार पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत जवळपास अडीच लाख रुपयांनी महाग आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहनपर सरकार तर्फे सबसिडीही दिली जात आहे. फेम-२ योजनेअंतर्गत मिळणा-या सबसिडीविषयी बोलायचे झाल्यास नेक्सन ईव्ही खरीदी केल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारतर्फे जवळपास २.८० लाख रुपयांची सूट मिळू शकते. याचबरोबर त्या-त्या राज्य सरकारांकडूनही सबसिडी देण्यात येत आहे.

दिल्लीबाबत बोलायचे झाल्यास तेथील राज्य सरकारतर्फे १.५० लाख रुपयांची सबसिडी देण्यात येत आहे. त्यामुळे एकूण सबसिडीचा विचार करायचा झाल्यास तुम्हाला ४.३० लाख रुपयांची सूट मिळू शकते.

सबसिडीचा समावेश केल्यास, टाटा नेक्सॉन EV ची ऑन-रोड किंमत १०.५० लाख रुपयांच्या जवळपास राहते. अशा प्रकारे, इलेक्ट्रीक कार खरेदी करताना तुम्हाची सुमारे २.८० लाख रुपयांची बचत होते.

ई-वाहनांमुळे दरवर्षी ७० हजारांपर्यंत बचत..

एक इलेक्ट्रिक कार चालवण्याची किंमत प्रति किलोमीटर सुमारे ०.८० रुपये इतकी येते. त्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक कारचा वापर काय केला तर तुम्हाला महिन्याला ६४० रुपये खर्च येऊ शकतो.

नेक्सनचे बेसिक पेट्रोल मॉडेल शहरात प्रति लीटर १६ किमी मायलेज देते. जर तुम्ही महिना ८०० किलोमीटर गाडी चालवत असाल तर महिन्याकाठी तुम्हाला कारमध्ये ५० लीटर पेट्रोल भरावे लागणार. यामुळे तुमचा इंधनावरील खर्च जवळपास ५ हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो.

इलेक्ट्रिक कारच्या देखभालीची किंमत जवळजवळ शून्य आहे. तर पेट्रोल कारसाठी दरमहा १ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

इलेक्ट्रिक कारचा वापर केल्याने तुमचे दरमहा ५ हजार ८६० रुपयांची बचत होऊ शकते. वर्षाचा विचार केल्यास हीच बचत ७० हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते.

एकूण नफ्याबाबत चर्चा करायची झाल्यास पहिल्यांदा इलेक्ट्रीक कार खरेदी करताना तुमची जवळपास २.८० लाख रुपयांची बचत होते.

त्यानंतर वार्षिक ७० हजार रुपयांप्रमाणे १० वर्षांची सात लाखांपर्यंत बचत हो शकते. अशा प्रकारे, जर तुम्ही १० वर्षे गाडी चालवली तर इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यामुळे तुम्ही सुमारे १० लाख रुपये वाचवू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT