इलेक्ट्रिक एअर टॅक्सी ची ‘नासा’कडून टेस्टिंग | पुढारी

इलेक्ट्रिक एअर टॅक्सी ची ‘नासा’कडून टेस्टिंग

वॉशिंग्टन : अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’ आता इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या चाचण्या घेत आहे. ही टॅक्सी 90 अंशांवर लँड आणि टेक-ऑफ करू शकते. ‘जॉबी एव्हिएशन’ कडून बनवलेल्या या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचे नाव ‘ईव्हीटीओएल’ असे आहे. ही टॅक्सी 2024 पर्यंत लाँच होऊ शकते.

या टॅक्सीचा वापर प्रवासी तसेच साहित्यसामग्रीला एका शहरातून दुसर्‍या शहरात नेण्यासाठी होईल.

ही चाचणी दहा दिवस सुरू राहणार आहे. 1 सप्टेंबरला ही चाचणी सुरू झाली असून ती 10 सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.

कॅलिफोर्निया शहरात या विजेवर चालणार्‍या आणि उडत्या टॅक्सीच्या चाचण्या होत आहेत. जवळपासच्या शहरांमध्ये वाहतूक करण्यासाठी ही टॅक्सी बनवण्यात आली आहे. टेस्टिंगवेळी तिची कामगिरी तपासून पाहण्यात येईल.

त्यानंतर आलेल्या रिपोर्टनुसार भविष्यात तयार होणार्‍या एअरटॅक्सीची मॉडेलिंग आणि सिमुलेशनची योजना बनवण्यात येईल.

भविष्यात एअर टॅक्सी सेवांना मान्यता देण्यासाठी कोणकोणत्या नियमांची गरज आहे हे सुद्धा या ट्रायलमधून समजून घेण्यात येईल.

‘नासा’च्या अ‍ॅडव्हान्स्ड एअर मोबिलिटी कॅम्पेनचे प्रमुख डेव्हिड हॅकेनबर्ग यांनी म्हटले आहे की विमान सेवांना भविष्यात आणखी सरस कशा बनवता येतील याची तपासणी सध्या सुरू आहे. टेस्टिंग यशस्वी झाल्यावर आगामी काही वर्षांमध्ये अशी सेवा संपूर्ण अमेरिकेत सुरू केली जाईल. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात मोठा बदल घडून येईल.

Back to top button