Horoscope Today PUDHARI PHOTO
ज्योतिष आणि धार्मिक

Horoscope Today: सुख, समृद्धी अन् सौभाग्य! मार्गशीर्ष पौर्णिमेला या चार राशींना मिळणार माता लक्ष्मीचा आशीर्वाद

या चार राशी आहेत लक्ष्मी मातेच्या प्रिय

Anirudha Sankpal

Horoscope Today Margshirsha Purnima 2025: हिंदू मान्यतेनुसार पौर्णिमेला मोठं महत्व आहे. वर्षाच्या शेवटची पौर्णिमा ४ डिसेंबर म्हणजे आज आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यातील ही पौर्णिमा असल्यानं त्याला धार्मिक दृष्ट्या देखील फार महत्व आहे. मान्यतेनुसार पौर्णिमेला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी पूजा केल्यानं घरातील सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढत.

प्रत्येक महिन्यात ज्यावेळी चंद्र आपल्या परिक्रमेवेळी पृथ्वीच्या बरोबर उलट्या दिशेत सूर्याच्या समोर येतो त्यावेळी पौर्णिमा असते. या दिवशी चंद्राचा संपूर्ण भाग हा प्रकाशित झालेला दिसतो. वैज्ञानिकांच्या भाषेत याला सुपरमून देखील म्हणलं जात. ज्योतिष शास्त्रानुसार १२ पैकी काही राशी आहेत ज्या माता लक्ष्मीच्या प्रिय मानल्या गेल्या आहेत.

वृषभ

वृषभ राशी पृथ्वी तत्वाची राशी मानली जाते. त्याचा मुख्य ग्रह हा शुक्र आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत. धैर्य आणि कष्टाळू असा असतो. शुक्राचा प्रभाव असल्यानं यांच्यावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते. वृषभ राशीचे लोक आपल्या कष्ट आणि स्थीर चित्ताच्या जोरावर जीवनात चांगली प्रगती करतात.

कन्या

कन्या ही राशीचक्रातील सहावी राशी आहे. ती देखील पृथ्वी तत्वाशी जोडली गेली आहे. या राशीचे लोक कष्टाळू जबाबदारी घेणारे, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे असतात. यांचा स्वभावात इमानदारी आणि मन लावून काम करण्याची वृत्ती असते. लक्ष्मी माता या राशीच्या लोकांची साथ कधी सोडत नाही. त्यांच्या कष्टाला नेहमी फळ मिळतं. त्यामुळे या राशीच्या लोकांकडे जीवनात संपत्तीची कमतरता नसते.

तूळ

तूळ राशी राशीचक्रातील सातवी रास आहे. ही वायू तत्वाशी जोडली गेलेली आहे. या राशीचा ग्रह हा शुक्र आहे. या राशीचे लोक देखील मेहनती स्वभावाचे असतात. तसंच ते न्यायप्रीय देखील असतात. या राशीच्या लोकांमध्ये कला आणि विशेष गुण आढळून येतात. लक्ष्मी मातेची विशेष कृपा या राशीवर असते. त्यामुळे या राशीचे लोक जीवनात अधिक सुखी असतात.

कुंभ

ज्योतिषानुसार कुंभ राशि चक्राची 11वी राशि मानी जातीचा आणि संबंध वायु तत्व होता. या राशिचे स्वभाव लोक से आत्मनिर्भर, मेहनती आणि समाजाची जबाबदारी घेणारे होते. आपले विचार गहरे आणि जुळवून घेतात. माना जाताना मां लक्ष्मी कुंभ राशिवर तुमची कृपा ठेवली जाते, चांगली मेहनत असते आणि जीवनाचा परिणाम मिळतो आणि पुढे संधी मिळते.

मीन

मीन राशि जल तत्वाला सूचित केले होते आणि त्याचे स्वामी देवगुरु बृहस्पति माने जातात, धन का कारक ग्रह सांगितले आहे. मीन राशिचे स्वभाव लोक खूप दयालु, भावुक आणि रचनात्मक मानतात. हृदयाला झटपट पिघल जाते आणि इतरांना मदत करताना आनंद होतो. इन्हीं गुणाकार की कारण से मं लक्ष्मी इन पर खास कृपा राखती आणि लोक जीवनात सुख-समृद्धी बनी रहती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT