

Vladimir Putin Net Worth in Rupees
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. तसेच हैदराबाद हाऊसमध्ये होणाऱ्या २३ व्या भारत रशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात अनेक डिफेन्स डील आणि उर्जा क्षेत्रासंबंधीचे करार होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांच्या दृष्टीकोणातून पुतीन यांची भारत भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारतात पुतीन यांची मोठी क्रेझ देखील आहे. त्यांच्या फिटनेस आणि स्पायगिरीच्या चर्चा सतत रंगत असतात. तसंच त्यांच्या संपत्तीबाबत देखील चर्चा होत असते.
पुतीन यांच्याकडे संपत्ती किती?
पुतीन हे रशियाचे राष्ट्रपती असल्यानं त्यांच्या संपत्तीबाबत अधिकृत अन् स्पष्ट अशी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र वेळोवेळी पुतीन यांच्या संपत्तीबाबत अनेक वृत्त बाहेर येत असतात. पुतीन यांची नेट वर्थ जवळपास २०० अब्ज डॉलरच्या जवळ असल्याचं बोललं जातं. ते संपत्तीच्या बाबतीत जगातील अनेक अब्जाधीश उद्योगपतींच्याही पुढे आहेत.
पुतीन हे गेल्या दोन दशकापासून रशियाचे राष्ट्रपती आहेत. त्यांच्या नेटवर्थबाबत फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग बिलेनिअयर्सकडे कोणताही डेटा नाही. मात्र फॉक्स बिजनेसच्या एका रिपोर्टनुसार पुतीन यांच्याकडे २०० अब्ज डॉलर्सच्या जवळपास संपत्ती आहे.
राष्ट्रपती पुतीन हे त्यांच्या लग्झरी आणि स्टायलिश जीवनशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच घर देखील त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसं असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुतीन हे सेंट पीटसबर्ग येथील आलीशान घरात राहतात. Alexei Nalvany च्या एका रिपोर्टनुसार पतून यांचा काळ्या समुद्राजवळ एक १.४ अब्ज डॉलर्स किंमतीचं १ लाख ९० हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला राजवाडा देखील आहे. त्याची किंमत ही १२ हजार ६२७ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं. हा राजवाडा अत्याधुनिक सोय-सुविधांनी सज्ज आहे.
पुतीन यांच्याकडे आलीशान राजवाड्याबरोबरच मेगा यॉट देखील आहे. त्याची किंमत जवळपास ९०१ एक कोटींच्या घरात आहे. त्यात २७० फुटात पसरलेली जीम, स्पा, लायब्ररी, डान्स फ्लोअर देखील आहे.
पुतीन यांच्याकडे ७०० गाड्या ५८ एअरक्राफ्ट देखील आहेत. पुतीन यांच्याकडे ७४ मिलियन डॉलर्सची एक खासगी ट्रेन देखील असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे राष्ट्रपती म्हणून व्लादिमीर पुतीन यांची वर्षाची मिळकत ही १ लाख ४० हजार डॉलर इतकी आहे.