

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या.
वृषभ : आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.
मिथुन : महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका.
कर्क : वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.
सिंह : नवीन भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा.
कन्या: चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. जीवनसाथी सोबत मिळून भविष्यासाठी आर्थिक योजना बनवाल. योजना यशस्वी होईल.
तूळ : कामाच्या ठिकाणी दिवस खूप सुंदर असेल. एकदम निष्कर्ष काढाल आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरेल.
वृश्चिक : आशावादी राहण्यासाठी प्रवृत्त करा. आत्मविश्वास, लवचिकता वाढेल, पण चिंतेमुळे निर्माण होणाया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा.
धनु : आज तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मतभेदामुळे त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल.
मकर : मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. गरजवंतांना मदत करण्यामुळे आदर मिळेल.
कुंभ : भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल.
मीन : तुमची ऊर्जा उच्च असेल. तुमचे प्रियजन आनंद निर्माण करतील. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल.