पुढारी वृत्तसेवा
राशींचा प्रभाव
मनुष्यचा स्वभाव हा ग्रह नक्षत्र आणि राशींमुळे निर्माण होत असतो. त्याच्या आयुष्यात झालेल्या होणार्या प्रत्येक घटना याचवर अवलंबून आहे.
जन्म कुंडली आणि रास
जन्म दिनांक, वेळ आणि ठिकाण यावर प्रत्येकाची जन्म कुंडली आणि रास अवलंबुन असते आणि या सर्व गोष्टी ग्रहांच्या जागांवरुन गणना करुन ठरवतात.
शास्त्र आणि राशी स्वामी
आपल्या शास्त्रात प्रत्येक राशीला स्वामी म्हणुन एक ग्रह दिला आहे आणि तोच ग्रह आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असतो.
पाश्चात ज्योतिषशास्त्र आणि वैदिक ज्योतिषशास्त्र फरक
पाश्चात ज्योतिषशास्त्र हे पृथ्वीवरच्या ऋतुवर अवलंबुन असते. त्यामुळे वैदिक आणि पाश्चात ज्योतिषशास्त्रामध्ये खुप तफावत जाणवते.
वैदिक ज्योतिषशास्त्र
वैदिक ज्योतिषशास्त्र हे अवकाशातील ग्रह आणि तारां वर अवलंबुन असते. भविष्यसूचक, कर्माच्या प्रभावांवर, भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील घटनांवर भर वैदिक ज्योतिषशास्त्र भर देतो.
पाश्चात ज्योतिषशास्त्र
विषुववृत्तांच्या पूर्वसूचनेमुळे उष्णकटिबंधीय राशी कालांतराने बदलते, ज्यामुळे पार्श्व राशीपेक्षा सुमारे २३-२४ अंशांचा फरक पडतो.मानसिक वैशिष्ट्ये, वैयक्तिक वाढ आणि प्रवृत्तीवर भर देतो.
चंद्र रास
चंद्र रास ही मनुष्याची भावना, प्रवृत्ती आणि अचेतन मन दर्शवत असते. ती मनुष्याची भावना, परिस्थिती मध्ये निर्माण होणार्या भावना, त्याच्या वैयक्तिक सुविधा आणि संरक्षण यासर्व गोष्टी जन्मावळी चंद्राच्या जागेवरुन अवलंबुन असते.
सुर्य रास
सुर्य रास ही मनुष्याच बाहेरील व्यक्तिमत्व ठरत असत. मनुष्याचे लक्षण, प्रेरणा आणि आत्म- भावनिकतेचे मौल्य हे जन्मावेळी सुर्यच्या जागावरुन अवलंबुन असते.
लग्न रास
लग्न रास ही मनुष्याची आपला दुसर्यांवर पडनारा प्रभाव निश्चित करत असतो. लग्न रास ही आपल्या जोडीदाराशी सुध्दा संबंधित असते.