Latest

Twitter: एलन मस्क यांचा प्लॅन; ट्विटरमधील ७ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क येत्या काही महिन्यांत ७ हजारांहून अधिक ट्विटर कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची प्लॅन आखत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

ट्विटरचे सर्व कामकाज हे न्यायालयाच्या आदेशाने जरी चालले असले तरी, लवकरच ट्विटर ही कंपनी एलन मस्क यांची होणार आहे. त्यामुळे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांचीच नोकरी गमावण्याची शक्यता नाही, तर मस्क ५५०० ट्विटर कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत आहेत. या कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढल्यानंतर ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची संख्या ही ७५०० वरून २००० पर्यंत पोहोचेल, असेही वॉशिंग्टन पोस्टच्या एका या अहवालात म्हटले आहे.

ट्विटर: लवकरच एलन मस्कच्या मालकीचे

एलॉन मस्क आणि ट्विटर कंपनीमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचलेल्या नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, एलन मस्क हे ट्विटकडून घेतलेल्या ४४ अब्ज डॉलर करारासंदर्भात चौकशीत आहे. यापूर्वी मस्कने ट्विटर विकत घेण्याच्या ऑफरला नकार दिला होता. याविरोधात ट्विटरने अमेरिकन न्यायालयात धाव घेतली होती. मस्क यांच्याविरोधात न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच एलन मस्क यांनी पुन्हा ट्विटर खरेदीचा प्रस्ताव सादर केला, तो ट्विटरने स्विकारला आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरला प्रति शेअर ५४. २० डॉलरने खरेदी करणारा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे ट्विटर ही कंपनी लवकरच एलन मस्क यांच्या मालकीची होणार आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT