Twitter New Feature : ट्विटरवर लवकरच मिळणार व्हॉट्सॲप शेअर बटन; जाणून घ्या नवीन फिचर विषयी | पुढारी

Twitter New Feature : ट्विटरवर लवकरच मिळणार व्हॉट्सॲप शेअर बटन; जाणून घ्या नवीन फिचर विषयी

पुढारी ऑनलाईन : ट्विटरवर लवकरच व्हॉट्सॲप शेअर बटन मिळणार आहे. याबाबत ट्विटरने सांगितले की, आम्ही आमच्या नवीन वैशिष्ट्याची भारतात चाचणी करत असून, यामध्ये एकदा बटनावर टॅप केले असता, ट्विट थेट व्हॉट्सॲपवर शेअर केले जाऊ शकते.

ट्विटर टेस्ट करत असलेल्या या नवीन फीचरमध्ये रेग्युलर शेअर बटनला सुद्धा व्हॉट्सॲप शेअरमध्ये कन्व्हर्ट करू शकते. सध्या ट्विटरच्या रेग्युलर शेअर बटनाच्या सहाय्याने कॉपी, बुकमार्क, डायरेक्ट मेसेज पाठवा, सोशम मीडियावर शेअर करा यांसारखे पर्याय मिळतात.

भारतात WhatsApp चे ४० कोटींहून अधिक यूजर्स

भारतात व्हॉट्सॲपची लोकप्रियता पाहता ट्विटरने हे पाऊल उचलेले आहे. WhatsApp चे देशात ४० कोटींहून अधिक यूजर्स आहेत. मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत एखादी माहिती, घटना शेअर करण्यासाठी हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे. म्हणूनच ट्विटर व्हॉट्सॲप सारख्या अधिक यूजर्संसाठी या नवीन प्लॅटफॉर्मची चाचपणी करण्याचे प्रयत्न ट्विटरकडून केले जात आहेत.

हेही वाचा:

Back to top button