संग्रहित छायाचित्र 
Latest

diesel price today : राज्यात डिझेल सुद्धा अब की बार शंभरच्या आरपार

backup backup

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त झालेल्या सामान्य माणसाला शनिवारी आणखी एक धक्का बसला. पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel price today) किंमतीत सलग पाचव्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी वाढ करण्यात आली.

ताज्या वाढीनंतर, डिझेलने (diesel price today) मुंबईत 100 रुपये लिटर टप्पा पार केला आहे. पेट्रोल 30 पैशांनी तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 35 पैसे प्रति लीटर महाग झाले आहे.

तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, दिल्लीत पेट्रोल 103.54 रुपयांवरून 103.84 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 92.12 रुपयांवरून 92.47 रुपये प्रति लीटरवर वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर सर्व उच्चांकी आहेत.

चार प्रमुख महानगरांबद्दल बोलायचं झाल्यास, पेट्रोल आणि डिझेल मुंबईंत सर्वात महाग आहे. येथे डिझेलने (diesel price) आज 100 पार केले आहे तर पेट्रोल 110 रुपयांची पातळी ओलांडण्याच्या जवळ आहे. ताज्या दरानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 109.83 रुपये झाले, तर डिझेल 100.29 रुपये प्रति लीटर झाले.

पेट्रोल आणि डिझेलची आजची किंमत

  • दिल्ली : पेट्रोल – ₹103.84 प्रति लीटर; डिझेल – ₹92.47 प्रति लीटर
  • मुंबई: पेट्रोल – ₹109.83 प्रति लीटर; डिझेल – ₹100.29 प्रति लीटर
  • कोलकाता: पेट्रोल – ₹104.52 प्रति लीटर; डिझेल – ₹95.58 प्रति लीटर
  • चेन्नई: पेट्रोल –101.27 रुपये प्रति लीटर; डिझेल – ₹96.93 प्रति लीटर

गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आज दिल्लीसह पेट्रोल सुमारे 1.5 रुपयांनी महाग झाले आहे. या महिन्याच्या पहिल्या 9 दिवसात पेट्रोलमध्ये दीड रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे देशातील वाहनांच्या इंधनाचे दर वाढत आहेत.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT