Latest

Dia Mirza : दियानं दाखविली मुलाची झलक, करीना कपूर म्हणाली…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं ( Dia Mirza ) गेल्या मे महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. यानंतर तिने तब्बल जवळपास १० महिन्यानंतर पहिल्यांदाच मुलाचा पुर्ण फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बॉलिवूड स्टार्ससोबत अनेक चाहत्यांनी या फोटोवर कॉमेंन्टसचा पाऊस पाडत आहेत.

दियाने गेल्या जुलै महिन्यात गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर दिया आणि पती वैभव रेखी यांनी मुलाचे नाव अवयान अजाद रेखी (Avyaan Azaad Rekhi) असे ठेवण्यात आलं. अवयानचे क्यूट फोटो पाहण्यास चाहते आतुरतेने वाट पाहत होते. याच दरम्यान दियाने ( Dia Mirza ) अवयानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, त्याचा पूर्ण फोटो कधीच शेअर केला नव्हता. तर सध्या दियाने गोंडस अवयानचा क्यूट पुर्ण फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये छोटा अवयान सोफ्यावर बसून आपल्या गालावर बोट ठेवून काहीतरी विचार करताना दिसला आहे. फोटोमध्ये अवयानने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि क्रिम रंगाचा पायजमा घातला आहे. याशिवाय अवयानच्या समोर एक फोटो असून त्यावर घोड्याचे छायाचित्र बनवले आहे. हा फोटो शेअर करताना तिने 'एक नवीन मैलाचा दगड, खूप प्रेम आणि कृतज्ञता नेहमीच. आम्ही असल्याबद्दल धन्यवाद. मी फोटो काढला आहे. आमचा मुलगा. वैभव रेखी.' असे लिहिले आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराने 'खूपच क्यूट.', नेहा धुपियाने 'ओ माय गुडनेस'. आणि करीना कपूरने 'गॉड ब्लेस यू पुडिंग'. असे लिहिले आहे. बॉलिवूड अभिनेत्री ताहिरा कश्यप आणि बिपाशा बसूने या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. यासोबतच एका युजर्सने 'हे ​​खूप गोंडस बाळ आहे' तर दुसऱ्या युजर्सने 'नजर लागेल' असे म्हटले आहे.

दिया मिर्झा फेब्रुवारी २०२१ मध्ये बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत विवाह बंधनात अडकली. या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पसरली होती. दिया आणि वैभव यांचा मुलगा अवयान आझाद रेखीचा जन्म मे २०२१ मध्ये झाला. मात्र, दिया आणि वैभवने जुलैमध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाल्याचा खुलासा केला होता.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT