मुंबई; पुढारी ऑनलाईन : तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वहिनी साहेब घराघरात पोहोचली. ही वहिनीसाहेब अर्थातचं अभिनेत्री धनश्री काडगावकर. धनश्री काडगावकरने अलिकडेच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. यानंतर ती चर्चेत आली होती. आता तिने बाथटबमधील एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.
सोशल मीडियावरतिने आपल्या बाळाचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत. त्याचबरोबर ती तिच्या बाळासोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने घरात वॉशरूम आणि बाथरूममध्ये व्हिडिओ केला आहे.
प्रसुतीनंतरच्या काही काळ विश्रांतीनंतर ती सोशल मीडियावर पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर रिल्स करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असते. मात्र, यावेळी तिने स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केलाय.
'कव्हर मी इन सनशाइन' या गाण्यावर तिने हा व्हिडिओ शूट केलाय. ती बाथटबमध्ये असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतयं.
Just having a great great time…. thankful…❤️ म्हणत तिने हार्ट इमोजी या व्हिडिओसोबत शेअर केलाय.
जानेवारी महिन्यात तिने पहिल्या बाळाला जन्म दिलाय. 'New life…New chapter' असं कॅप्शन देत तिने ही गूडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती.