cannes 2022 : deepika padukone  
Latest

Deepika Cannes Video: ‘तो’ दीपिकाला KISS करत राहिला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सध्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Cannes Video) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करताना दिसत आहे.  यावर्षी ज्युरी सदस्यांमध्ये तिचा समावेश आहे आणि दररोज दीपिकाचे अनेक आकर्षक लूक पाहायला मिळत आहेत. हे लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत कान्सच्या रेड कार्पेटवरून दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला असून, ताे चर्चेचा विषय ठरला आहे. (Deepika Cannes Video)

खरंतर दीपिकाची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. चाहते  तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत असतात. अशीच काही फॅन फॉलोइंग कान्सच्या रेड कार्पेटवरही पाहायला मिळाली.

दीपिकाला पाहतच राहिला तो व्यक्ती

हॉलिवूड स्टारची नजर दीपिकावर पडताच ती व्यक्ती दीपिकाला भेटल्याशिवाय राहू शकली नाही. दीपिकासाठी हे थोडे अनपेक्षित असले तरी दीपिका रेड कार्पेटवर पापराझींसाठी पोज देण्यात बिझी होती. त्यावेळी अचानक मधूनच एक व्यक्ती आली. काही समजण्याआधीच त्याने दीपिकाला किस करून हग मारायला सुरुवात केली.

दीपिकाने दिली अशी प्रतिक्रिया

अशा परिस्थितीत, दीपिकाने ही परिस्थिती अत्यंत हुशारीने हाताळल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. दीपिका सुरुवातीला थोडी अस्वस्थ दिसली आणि ती या व्यक्तीचा हात तिच्या कंबरेवरून काढताना दिसली. पुढे दीपिका त्या व्यक्तीसोबत फोटो पोझ देताना दिसली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

यादरम्यान दीपिका लाल रंगाच्या डीप नेक स्ट्रॅपी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीच्या या लूकमध्ये डायमंड नेकलेसची भर पडली होती. पोनीटेल हेअरस्टाईल, स्मोकी आईजने तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले होते.

चित्रपटांपेक्षा मोठ्या उत्सवात कान फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलिब्रिटींची गर्दी पाहायला मिळतेय. बॉलीवूडच्या अदाकारा देखील फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकमुळे सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहेत. पण, यंदा सर्वांच्या नजरा फक्त दीपिकावर खिळल्या. रेड कार्पेटचं नव्हे तर यंदा ज्यूरी मेंबर म्हणून तिने कान महोत्सवात उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर, तिने रेड कार्पेटवरदेखील प्रत्येक लूकमुळे लाईमलाईटमध्ये राहिली. आता पुन्हा एकदा तिने नव्या लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर फॅन्स तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

(video-deepikacraze insta)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT