hritik roshan and deepika padunone  
Latest

Fighter First Look : चौथ्यांदा टळली रिलीज डेट, एरियल ॲक्शनमध्ये दीपिका-हृतिक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांचा चर्चित चित्रपट फायटरची नवी रिलीज डेट घोषित करण्यात आली आहे. (Fighter First Look) याआधी चार वेळा चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आलीय. आता चित्रपट निर्मात्यांनी पोस्टर जारी करून रिलीज डेट २५ जानेवारी, २०२४ असल्याचे सांगितले आहे. हे पोस्टर चित्रपटाच्या स्टार कास्टनेदेखील शेअर केले आहेत. (Fighter First Look)

ॲक्शन करताना दिसेल दीपिका

दीपिकासोबत पहिल्यांदा हृतिक रोशन ॲक्शन करताना दिसणार आहे. दीपिकाने चित्रपटाचा फर्स्ट लुक आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे आणि कॅप्शन दिलीय – आपल्या खुर्चीचा बेल्ट बांधून घ्या. फायटर भारताचा पहिला एरियल ॲक्शन चित्रपट असेल. दीपिकाच्या पोस्टनंतर फॅन्सच्या कमेंटचा वर्षाव झाला.

हृतिक रोशननेदेखील या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हृतिकने ट्विट केलं आहे – २५ जानेवारी, २०२४ – भेटू थिएटर्समध्ये. हृतिकच्या या ट्विटवर फॅन्स कमेंटचा पाऊस करत आहेत. युजर्सचं म्हणणं आहे की, प्रभासच्या सालार चित्रपटामुळे रिलीज डेट टळली आहे का? की शाहरुख खानच्या पठाणमुळे. तर काहींनी आदिपुरुषचे व्हीएफएक्स पाहता म्हटलं की, उशीर झाला होऊ दे, पण सीजीआय चांगलं हवं. काहीही असो फॅन्स हृतिकला पुन्हा ॲक्शन करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अनेकदा बदलली रिलीज डेट

फायटरची रिलीज डेट चारवेळा बदलली आहे. चित्रपटाची घोषणा आधी २०२१ मध्ये हृतिकच्या वाढदिवसाला करण्यात आलं होतं. यानंतर २६ जानेवारी, २०२३ ला रिलीज डेट निश्चित करण्यात आली होती. नंतर ही डेट बदलून २८ सप्टेंबर, २०२३ करण्यात आली होती. आता असं म्हटलं जात आहे की, फिक्शन चित्रपट पाहता निर्मात्यांनी २५ जानेवारी, २०२४ रिलीज डेट केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT