छगन भुजबळ,www.pudhari.news 
Latest

नाशिकमधील गुन्हेगारी आवरा अन्यथा रस्त्यावर उतरु : छगन भुजबळांचा इशारा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. दर दिवसाआड खुनाची घटना समोर येत आहे. त्यामुळे शहरातील वातावरण बिघडत असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झाले आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी थांबवावी अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरतील, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.

नाशिक येथे आले असता माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी हा इशारा दिला. नाशिक शहरात मागील आठवडाभराचा विचार केला तरी दोन खून, अनेकांवर प्राणघातक हल्ले, गोळीबार, कोयता गँगची दहशत आदी घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फुलेनगरपरिसरात भरवस्तीत घरात घुसून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सातपूर परिसरात दिवसाढवळ्या पूर्ववैमन्यसातून गोळीबार करण्यात आला. यातील संशयित अद्यापही फरार आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात कंपनी व्यवस्थापकाच्या खून करण्यात आला. यातील संशयित अद्यापही फरार आहेत. तर काल दहावीच्या पेपर सुटल्यानंतर काही संशयितांनी अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला करत पळ काढला.

या सर्व घटना या भरवस्तीत होत असल्याने पोलिसांचा कुणाला धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रविवारी भुजबळांनी पोलिस आयुक्तांवर देखील निशाणा साधला.

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली आहे.  मारहाण, खून, प्राणघातक हल्ले अशा घटना सातत्याने समोर येत आहेत.  पोलिसांकडून एक गुन्ह्याची उकल होत नाही, तोच दुसरा गुन्हा घडत आहे.  अल्पवयीन मुलेदेखील गुन्हेगारीकडे वळत  असल्याचे चित्र आहे.  राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला इशारा देत गुन्हेगारी आवरली गेली नाही तर  नाशिककर रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी पोलिस आयुक्तांसह राज्य शासनाला दिला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT