Latest

MS Dhoni : ‘धोनी’वर खटला दाखल, फसवणूक प्रकरणी अडचणीत वाढ

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर बिहारमधील बेगुसराय येथे खटला दाखल करण्यात आला. त्याच्या सोबत आणखी सात जणांवर खटला करण्यात आला आहे. या खटल्याप्रकरणी येत्या २८ जून रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

भारतचा संकटमोचक महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) स्वत:च संकटात सापडला आहे. त्याच्या व त्याच्या कंपनीवर चेक बाऊन्सप्रकरणी (Check Bounce Case) बिहारमध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. डी. एस. एंटरप्रायजेसच्या नीरज कुमार निराला यांनी हा खटला दाखल केला आहे. बेगुसरायचे जिल्हा न्यायालय रुपा कुमारी यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावनी केली जाणार आहे.

या घटल्यात नीरज कुमार यांनी एमएस धोनीवर असा आरोप केला आहे की, २०२१ मध्ये न्यू ग्लोबल उपजवर्धक इंडिया लि. (Upajwardhak India Ltd, New Delhi) या कंपनीकडून शेती कामी वापरले जाणारे एक उत्पादन खरेदी केले. यासाठी त्यांनी कंपनीला ३६ लाख ८६ हजार रुपयांचा भरणा केला. पुढे कंपनीच्या असहकार्यामुळे संबधीत उत्पादन निराला हे विक्री करु शकले नाहीत. पुढे कंपनीने ३० लाखांचा चेक देऊन सर्व उत्पादन पुन्हा मागवून घेतले. कंपनीने दिलेला चेक बाऊन्स झाला. त्यानंतर निराला यांनी याबाबत कंपनीला नोटीस पाठवली. पण, कंपनीने कोणतीच दाद दिली नाही.

यानंतर निराला यांनी कंपनीच्या सात जणांवर बेगुसराय येथे खटला दाखल केला. तसेच या उत्पादनाची जाहीरात महेंद्रसिंह धोनी करत असल्याने त्यांच्यावर देखिल खटला दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT