पुणे : अभ्यासाकडे लक्ष दे, म्हटल्याने मुलाने केली आत्महत्या | पुढारी

पुणे : अभ्यासाकडे लक्ष दे, म्हटल्याने मुलाने केली आत्महत्या

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा  : पिंपरी येथील दिघी परिसरात वडीलांनी मुलाला मोबाईलचा वापर कमी कर आणि अभ्यासाकडे जरा लक्ष दे, असे सांगितले. वडीलांच्या या बोलण्याचा राग आल्याने नववीमध्ये शिकणा-या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बद्रीनाथ विष्णू राठोड (वय १६, रा. आळंदी देवाची, परभणी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड कुटुंबीय मूळचे परभणी येथील आहेत. विष्णू राठोड हे गवंडी काम करतात. त्यांची पत्नी सुनीता देखील मजुरी काम करून संसाराला हातभार लावते. मात्र, आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, अशी दोघांचीही इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पोटाला चिमटा काढून बद्रीनाथच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या मोबाईलसह सर्व वस्तू त्‍यांनी त्‍याला दिल्‍या हाेत्‍या. मात्र, दरम्यानच्या काळात बद्रीनाथ मोबईलच्या आहारी पडला होता. त्यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांना जाणवत होते.

वडील विष्णू यांनी बद्रीनाथ याला मोबाईलचा वापर कमी कर, अभ्यासाकडे लक्ष दे, असे सांगून समज दिली. त्यानंतर पत्नी सुनीता आणि विष्णू दोघेही घराबाहेर निघून गेले. त्यावेळी बद्रीनाथ आणि त्याची लहान बहीण घरात होते. दरम्यान, आई- वडील रागावून घराबाहेर गेल्याचा राग आल्‍याने बद्रीनाथ अस्वस्थ झाला. त्‍याने बहिणीला अंघोळीला जातो, असे सांगून बाथरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळ बद्रीनाथ बाहेर आला नसल्याने बाहिनेने त्याला आवाज दिला. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तिने आई- वडिलांना फोन करून बोलवले. त्यांनी बाथरूममध्ये पाहिले असता बद्रीनाथने गळफास घेवून मृत अवस्‍थेत दिसला. दिघी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा  

Back to top button