पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाचे चाहत्यांना वेड लागले आहे. त्यांच्या लग्नाच्या सर्व फंक्शन्सचे फोटो पाहण्यासाठी ते उत्सुक असतात. सेलिब्रिटी आपल्या लग्नाचे फोटो कुठेही लिक होऊ नये याची ते काळजी घेतात. आता या अभिनेत्यांचे लग्नाच्या फोटोंना जास्त मागणी आहे. त्यामुळे सध्या बाजारात त्यांच्या फोटोंना जास्त पैसे मिळतात. कॅटरीना आणि विकी कौशल यांच्या लग्नातील फोटोंना करोडो रुपये मिळणार आहेत. ते असे एकमेव कपल नाही ज्यांनी लग्नाचे फोटो विकुन पैसे कमावलेत.
कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांचे नुकतेच राजस्थानमध्ये कडेकोट बंदोबस्तात लग्न झाले. त्यांच्या लग्नाचे टेलिकास्ट करण्याचे अधिकार Amazon Prime ला 80 कोटी रुपयांना विकले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि जीन गुडइनफ यांचे लग्नही कडक सुरक्षेत झालं आहे. यांच्याही लग्नातील फोटोंना जास्त पैसे आले होते. लग्नाचे पोटो विकुन त्यांनी कोट्यवधी रुपये मिळवले आहेत. त्या दोघांनी ते पैसे गरिबांना दान केले आहेत.
जागतिक स्टार प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये राजस्थानच्या उमेद भवन मध्ये अमेरिकी गायक निक जोनस सोबत हिंदू पध्दतीने लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल मॅगझीनने १८ कोटी रुपयांना विकला होता.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनेही आपल्या लग्नाचे फोटो विकले होते. त्यांच लग्न इटली मध्ये झाले होते. त्यांच्या लग्नाचे पोटो एका मॅगजीनने करोडो रुपयांना विकत घेतले होते. विराट आणि अनुष्का शर्माने हे पैसे गरजु लोकांना दिले होते.
हेही वाचलत का?