Latest

Janhvi kapoor : जान्हवीचा बॅकलेस जंपसूट, बघणाऱ्यांचे डोळे विस्फारले

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) अभिनयासोबत तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. जान्हवीच्या फॅशनने अनेक चाहत्यांना भूरळ पाडली आहे. परंतु, सध्या तिच्या फॅशनमुळे चाहत्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी नेटकऱ्यांकडून जाव्हवीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

नुकतेच जान्हवी कपूर ( Janhvi kapoor ) तिची खास मैत्रीण अभिनेत्री अनन्या पांडे आणि चुलत बहीण शनाया कपूरसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी पोहोचली होती. या डिनरसाठी आलेल्या अनन्या आणि शनायाकडे चाहत्याचे फारसे लक्ष गेले नाही. परंतु, जान्हवी कपूरने घातलेल्या ड्रेसवर सर्वाच्या नजरा खिळल्या.

यावेळी जान्हवीने आकाशी रंगाचा बॅकलेस जंपसूट परिधान केला होता. या जंपसूटचा गळा ड्रिप असल्याने क्लीवेज स्पष्टपणे दिसत होत्या. यावेळी तिने मोकळ्या केसांसह न्यूड मेकअप केला होता. या डिनर डेटचा व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यत १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. शेअर झालेल्या एका फोटोत जान्हवी रेस्टॉरंटच्या दरवाज्यामधून आत जाताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही चाहत्यांनी जान्हवीचे भरभरून प्रतिक्रिया देत कौतुक केले. तर काही चाहत्यांना तिचा हा लूक पसंतीस पडला नाही. याच दरम्यान एका नेटकऱ्याने तिला 'अभिनेत्री किम कार्दशियन सारखी आहेस का?', 'मोठी होवून मलायका अरोरा बनणार आहेस काय?', 'बहूतेक उर्फी जावेदची नक्कल करत आहेस?', तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिला ट्रोल करताना 'हिला कपडे परिधान करण्याचा सेन्स नाही', 'टॉप क्लास व्हर्जन ऑफ उर्फी जावेद' आणि 'नेहमी सभ्य कपडे घाला' असा प्रकारच्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केला आहे.

याआधीही जान्हवीने चमकदार सिल्वर रंगाचा ड्रेस आणि प्लंगिंग नेकलाईन ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. सिल्व्हर रंगाच्या ड्रेसच्या फोटोवर चाहत्यांनी 'जब इश्क की बीमारी लगती है तो, चुड़ैल भी प्यारी लगती है', 'एक तेरी ही ख्वाहिश है, मुझे सारी दुनियां किसने मांगी है!..'. अशी हटके कॉमेन्टस केल्या आहेत. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत. याशिवाय जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले अपडेट देत असते.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT