केंद्राचा मोठा निर्णय : हाफिज सईदचा मुलगा हाफिज ताल्हा सईद दहशतवादी घोषित

haifiz talha
haifiz talha
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २६/११ हल्ला घडवून आणणारा मोरक्या आणि लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईदचा मुलगा हाफिज ताल्हा सईद याला केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. शनिवारी यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयाने नोटिफिकेशन काढले आहे. देशात लष्कर-ए-तोयबा कडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा कट रचणे, फंडिंग तसेच रिक्रूटमेंटमध्ये देखील ४६ वर्षीय हाफिज ताल्हा सईदचा समावेश होता, असे मंत्रालयाने नोटिफिकेशनमधून स्पष्ट केले आहे. पाकिस्तानात विविध ठिकाणी सुरू असलेल्या लष्कर-ए-तोयबा च्या केंद्राचा दौरा देखील हाफिज ताल्हा करीत असल्याचेही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या मौलवी विंगचा प्रमुख तसेच लष्करचा मोठा दहशतवादी असलेला हाफिज ताल्हा सईद भारताच्या हितांविरोधात पश्चिमी देश तसेच अफगाणिस्तानमध्ये जिहाद पसरवण्यात सहभागी आहे. सोबतच भारत, इस्रायल,अमेरिका तसेच इतर पश्चिम देशांमध्ये भारतीय हितांच्या विरोधात जिहाद करण्याचे आवाहन करणारे वक्तव्य तो देतो, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिज सईदचे डोके होते. या हल्ल्यात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याला देखील भारताने दहशतवादी म्हणून घोाषित केले होते. सध्या दहशतवादी कारवायांना खतपाणी घातल्याप्रकरणी तो पाकिस्तानच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. भारताकडून हाफिज सईदची कस्टडी मागितली जात आहे. परंतु, पाकिस्तान सईदची कस्टडी देण्यास नकार देत आहे.

हेही वाचलंत का ?  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news