राज्यात अराजक पसरविण्याचे प्रयत्न : जितेंद्र आव्हाड | पुढारी

राज्यात अराजक पसरविण्याचे प्रयत्न : जितेंद्र आव्हाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ नेत्याच्या घरासमोर हिंसक आंदोलनासारखे प्रकार लोकशाहीमध्ये अशोभनीय आहेत. या आंदोलनातून राज्यात अराजक पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवार) मूक आंदोलन केले. यावेळी मंत्री आव्हाड यांनी आंदोलनात सहभागी होत निषेध नोंदवला. यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी दगडफेक, चप्पलफेक करण्यात आल्याने मोठा गदारोळ माजला होता. या आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button