Latest

Prashant Kishor : २०२४ मध्ये भाजपचा पराभव शक्य : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : "२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव केला जाऊ शकतो. भाजपनं हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोककल्याणकारी धोरणांचे भक्कम आख्यान तयार केलं आहे. विरोधा पक्षांना दोन आघाड्यांवर भाजपला मात द्यावी लागणार आहे", असं मत रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्‍यक्‍त केले आहे.

Prashant Kishor : भाजपविरोधात आघाडी तयार करायची आहे

प्रशांत किशोर (Prashant Kishor) एका वृत्तवाहिनीने दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करणं शक्य आहे; पण विरोधकांची सध्याची जी परिस्थिती आहे, त्यावर भाजपला पराभूत करणं शक्य नाही. भाजप विरोधी आघाडी झाल्याशिवाय हे शक्य नाही. मला अशी आघाडी तयार करायची आहे. जी भाजपला २०२४ मध्ये भाजपला जोरदार टक्कर देईल", अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.

पाच ते १० वर्षांची रणनीती आखावी लागेल

यावेळी लोकसभेच्या २०० जागांचा उल्लेख करत प्रशांत किशोर यांनी केला. ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्या थेट टक्कर होणार आहे. या ठिकाणी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं ९५ जागा मिळवल्या आहे, तसेच त्या १९५ मध्ये बदलू शकतात. "ज्या पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल त्यांना कमीतकमी ५ ते १० वर्षांची रणनिती तयार करावी लागेल. हे पाच महिन्यांत होणं अशक्य आहे", असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

काॅंग्रेसमध्ये व्यापक बदल होणं आवश्यक

"प्रशांत किशोर आणि काॅंग्रेसने एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं वाटणं स्वाभाविक आहे; पण काॅंग्रेसकडून तसं झालं. नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विश्वास ठेवून पाऊल टाकायला हवं. भाजपचा पराभव करायचा असेल तर काॅंग्रेसमध्ये व्यापक बदल होणं आवश्यक आहे. काॅंग्रेसला एक विचार म्हणून कमकुवत होताना पाहिलं जाऊ शकत नाही. त्यांचं बळकट होणं गरजेचं आहे", असेही ते म्‍हणाले.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT