Corona : दिलासा! देशातील रुग्णसंख्येत ५० हजारांनी घट, २४ तासांत २ लाख ५५ हजार नवे रुग्ण, ६१४ मृत्यू

Corona : दिलासा! देशातील रुग्णसंख्येत ५० हजारांनी घट, २४ तासांत २ लाख ५५ हजार नवे रुग्ण, ६१४ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ५५ हजार ८७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका आठवड्यातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ५०,१९० ने कमी आहे. पण दिवसभरात ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात २२ लाख ३६ हजार ८४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५.५२ टक्के आहे.

याआधीच्या दिवशी कोरोना तपासण्यांचे प्रमाण मंदावल्याने दिवसभरात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत २७ हजार ४६९ ने घट नोंदवण्यात आली होती. रविवारी दिवसभरात ३ लाख ६ हजार ६४ कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. तर, ४३९ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान २ लाख ४३ हजार ४९५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९३.०७ टक्क्यांपर्यंत घसरला होता.

कोरोना महारोगराईच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता खबरदारी म्हणून रविवारपर्यंत ८१ लाखांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पूरवण्यात आलेल्या १६२ कोटी ७३ लाख ६ हजार ७२५ डोस पैकी १३ कोटी ८५ लाख ३ हजार ११६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.

दरम्यान, देशातील कोरोना (Coronavirus) परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज मंगळवारी ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.

अमरावती : ओमायक्रॉनचे पुन्हा दोन सबव्हेरियंट, कोरोना बदलतोय रूप

देशात डेल्टा प्लस या व्हेरियंटची नोंद पहिल्यांदा अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये झाली होती. त्यानंतर आता ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट असलेल्या बी. ए. वन. व बी. ए. टू या विषाणूची नोंद पुन्हा जिल्ह्यात झालेली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान केंद्रातून प्राप्त जिनोम सिक्वेन्सिंगच्या १८ नमुन्यापैकी दोनमध्ये ओमायक्रॉन व ११ मध्ये बी एवन व पाचमध्ये बी एटू हे सबव्हेरियंट आढळले आहेत.

कोरोना विषाणूची जनुकीय रचना सतत बदलत राहते. यामुळे तीन लाटांचा सामना सर्वांना करावा लागला. आता कोरोनाच्या जनुकीय रचनेत बदल होऊन ओमायक्रॉनचा हा व्हेरियंट तयार झाला आहे व यामुळे तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून तिसऱ्या लाटेला सुरुवात त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने व्होल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. यामध्ये २१ नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनची नोंद आढळून आली आहे.

पुन्हा ओमायक्रॉनचे सबव्हेरियंट आढळून आले असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. जगभरात भारतासह डेन्मार्क, स्वीडन व सिंगापूर येथे ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत जगभरातील ४o देशात या व्हेरियंटचा फैलाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या व्हेरियंटचा संसर्गदर ओमायक्रॉन सारखाच, पण चिंताजनक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news