यवत; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील पारगाव सा. मा. येथील भीमा नदीपात्रात ८ ते २४ जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला ही सामूहिक आत्महत्या असल्याचे सांगितले जात असताना मात्र मंगळवारी (दि. २५) रात्री उशीरा पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी नगर आणि बीड जिल्ह्यातून काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर ही सामूहिक आत्महत्या नसून मोठे हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. शिरूर तालुक्यातील एका गावात वरील सर्वांची हत्या करण्यात आली असून, मृतदेह दौड तालुक्यातील पारगाव हद्दीत आणत नदीत टाकून देण्यात आले आहेत.
या सर्व घटनेचा तपास पुणे ग्रामीणचे अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. त्यांनी मंगळवारी रात्रभर दौड आणि शिरूर तालुक्यात स्वतः उपस्थित राहत तपास यंत्रणा सुरु ठेवली. दरम्यान मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी रितेश शामराव फुलवरे (वय अंदाजे ७ ते ८ वर्ष), छोटू फुलवरे (वय अंदाजे पाच वर्ष) तर कृष्णा फुलवरे (वय अंदाजे तीन वर्ष) या मुलांचे मृतदेह सापडले होते, तर १८ ते २४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात मोहन उत्तम पवार (वय अंदाजे ५० वर्ष), संगीता मोहन पवार (वय अंदाजे ४५ वर्ष), शामराव पंडित फुलवरे (वय अंदाजे ३२ वर्ष), राणी शामराव फुलवरे (वय अंदाजे २७ वर्ष) आणि रितेश शामराव फुलवरे (वय ७ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून होते.
याबाबत नातेवाईकांनी अशी माहिती दिली की, मृत मोहन पवार व संगीता पवार हे मृत शामराव फुलवरे यांचे सासू-सासरे आहेत. तसेच शामराव व राणी फुलवरे यांना तीन मुले असून मंगळवारी दुपारी सापडलेले तीन मुलांचे मृतदेह हे मयत शामराव फुलवरे यांच्या मुलांचे आहेत. मोहन पवार हे खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील असून शामराव फुलवरे हे येळंब (ता. जि. बीड) येथील आहेत. सध्या हे सर्वजण व्यवसायानिमित्त निघोज (ता. शिरूर) येथे रहात होते, अशी माहिती शामराव फुलवरे यांचे नातेवाईक दीपक शिंदे यांनी दिली. मृतदेह सापडण्याच्या या सत्रामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
२३ जानेवारी रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भीमा नदीपात्रातील ठिकाणी भेट देऊन पहाणी केली तर. यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलीस आधिकारी यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
घडलेल्या या घटनेमध्ये घातपाताची शक्यता आहे असे मृत शामराव फुलवरे याचे नातेवाईक दीपक शिंदे यांनी मत व्यक्त केले होते. त्यानुसार पोलीस तपास करत होते. तसेच जोपर्यंत या घटनेचा योग्य तपास लागत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता त्यामुळे पोलीस यंत्रणा कसून चौकशी करत होती.
मोहन पवार यांच्या चुलत भावांनी केल्या हत्या
७ जणांचा खून मयत मोहन पवार यांच्या चार चुलत भावांनी केल्याचे उघडकिस आल्याचीही चर्चा आहे, पोलिसांनी मात्र यासंदर्भात अद्याप काहीच सांगितले नाही.चुलत भावापैकी एकाच्या मुलाचा अपघात करुन खून केलाचा संशयातून ७ जणाची हत्या करुन भिमा नदी पात्रात मृतदेह फेकले असे सूत्रांकडून समजते
हेही वाचा