पुणे : शिवाजी पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार | पुढारी

पुणे : शिवाजी पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवाजी पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज विष्णूकुमार शेळके (वय 22, रा. अंबड, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. शेळके याचा मित्र प्रज्वल काळे (वय 22, रा. पिंपरी) याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेळके हा औषध उत्पादक कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी होता. दुचाकीस्वार शेळके दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास शिवाजी पुलावरून निघाला होता. त्या वेळी भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या शेळकेचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक विजय पानकर तपास करत आहेत.

Back to top button