बीड : केजमध्ये भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न! | पुढारी

बीड : केजमध्ये भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न!

केज(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २०) दुपारी २:३० केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्‍या. यावेळी त्यांना एका कारमधून त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ व सुरेखा यांच्या माहेरचे सुरेखाचा भाऊ हरिदार भास्कर महाले आणि तिची आई मुंजाबाई भास्कर महाले व एक अनोखी महिला आणि वाहन चालक यांनी रस्त्यात अडवले. यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी दमदाटी केली. तसेच तुझ्यामुळे मधुकर वाघ हा जेलमध्ये असल्याने त्याची सुटका करण्यासाठी पोलीस केस मागे घे, असे वाद घातला.

यांनतर त्या महिलांनी त्यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकून गळा आवळला आणि हरिदास मुंजाबा महाले याने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला. यानंतर आशा वाघ- गायकवाड यांनी आरडा-ओरड करत समोरील हॉटेल मधूबनकडे पळाल्‍या. लोक जमा होताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान आशा वाघ-गायकवाड यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्‍यान, नायब तहसीलदार यांच्यावर सहा महिन्यापुर्वीही हल्‍ला झाला होता. आशा वाघ-गायकवाड यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावाने हा जीवघेना हल्‍ला केला होता. या हल्लेखोर भावाला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

हेही वाचा 

संतापजनक; सामूहिक अत्याचारानंतर हत्या, हैवानांचा महिलेच्या मृतदेहावरही बलात्कार

परभणी: पंचायत समिती आवारात सरपंच, माजी पदाधिकाऱ्यात फ्रीस्टाईल हाणामारी

बीड जिल्ह्याची संपूर्ण ताकद किरण पाटलांच्या पाठीशी; आमचा विजय निश्चित – पंकजा मुंडे

Back to top button