बीड : प्रवाशाचा हृदयाविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू | पुढारी

बीड : प्रवाशाचा हृदयाविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू

केज ; पुढारी वृत्‍तसेवा- एसटी बसमधून खाली उतरताना वयोवृद्ध प्रवाशाला हृदयाविकाराचा तीव्र धक्‍क्‍याने मृत्यू झाला. आज (दि. २४) सकाळी साडेसहाच्‍या सुमारास ही घटना घडली.  शेषराव नारायण बनसोडे (वय ७५ रा. वरपगाव) असे मृत्‍यू झालेल्‍या प्रवाशाचे नाव आहे.

शेषराव बनसोडे आज  (दि. २४) वरपगाव-केज गाडी क्र. (एम एच-३०/बी एल-०१२५) ने प्रवास करीत होते. सकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान केज बस स्टँडवर उतरत असताना त्यांना हृदयविकाराच्‍या   झटका आला. एसटीचे वाहक तांदळे आणि चालक लोकरे यांनी ही माहिती तात्काळ वाहतूक नियंत्रक जगदीश चिक्ची यांना दिली.

चिक्ची यांनी तात्काळ ही माहिती पोलीसांना देऊन आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. या वेळी बस स्टँडवर उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा. विनोद गुंड, चंद्रकांत मस्के, दिलीप गवळी आणि दिलीप बनसोडे यांनी त्यांना मदत केली. शेषराव बनसोडे यांचा मुलगा संतोष बनसोडे हा कुटुंबासह उस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर गेला आहे. त्‍यामुळे शेषेराव त्यांच्याकडे जाण्यासाठी केजकडे निघाले असतानाही ही घटना घडली.

हेही वाचा  :  

Back to top button