LAKSH 
Latest

Bharti Singh : भारतीने बाळाचे असे काही फोटोशूट केले की…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन भारती सिंहने (Bharti Singh) आपल्या बाळाचे फोटोशूट केले आहे. भारतीच्या बाळाचे नाव लक्ष्य आहे. पण, नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. तुम्हाला माहितीये का, भारतीने लक्ष्यचे खूप सुंदर फोटोशूट केले आहे. पण, तिच्या एका चुकीमुळे भारतीवर टीका होत आहे.

टीव्हीची प्रसिध्द कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या वर्षी आई-बाबा झाले आहेत. त्यांनी बाळाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. भारती आपल्या बाळासोबत खूप सारा वेळ घालवत आहे. भारती-हर्ष आपल्या बाळाचे अपडेट्स आणि क्यूट फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. (Bharti Singh)

हे फोटो भारती आणि हर्षच्या फॅन्सच्या पसंतीस उतरतात. परंतु, यावेळी भारतीने असं काही केलंय की, तिचे फॅन्स नाराज झाले आहेत. शिवाय नेटकर्‍यांनीही तिला सुनावलं आहे. भारतीने लक्ष्यच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये लक्ष्य सौदी अरेबियाच्या प्रिन्सच्या गेटअपमध्ये दिसत आहे. तो एका खुर्चीमध्ये बसलेला दिसतो. या फोटोमध्ये इफेक्ट देण्यासाठी लक्ष्यजवळ एक हुक्का ठेवण्यात आल्याचे दिसते.

भारतीच्या फॅन्सने इतक्या छोट्या बाळाजवळ हुक्का ठेवल्यामुळे ती संताप व्यक्त केला आहे. या मुद्द्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे. एका फॅनने लिहिलं आहे की, हुक्का बाळाच्या जवळ का ठेवलं आहे? आणखी एकाने म्हटले की- तू आतापासून मुलाला बिघडवत आहेस. आणकी एकाने लिहिले-खूपचं क्यूट बाळ आहे; पण ही थीम आरोग्यासाठी धोकादायक आहे.

क्यूटनेस ओव्हरलोडेड

याआधीही भारतीने लक्ष्यचे खूप सुंदर फोटो शेअर केले होते. यामध्ये हॅरी पॉटरच्या स्टाईलमध्ये लक्ष्य खूप क्य़ूट दिसला होता.या फोटोमध्ये लक्ष्यने डोळे बंद केले होते. आणि हॅरी पॉटरसारखा चष्मा देखील डोळ्यांवर होता. त्याच्या हाता जादूची छडीदेखील दिसत होती. लक्ष्यची ही क्यूट फोटो पाहिल्यानंतर भारतीचे फॅन्स तिला बाळासोबतचे व्हिडिओ शेअर करण्याची विनंती करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT