Womens ODI World Cup : भारत 2025 मध्ये महिला वनडे क्रिकेट वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार | पुढारी

Womens ODI World Cup : भारत 2025 मध्ये महिला वनडे क्रिकेट वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 2025 मध्ये भारत महिलांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार ( India Host Womens ODI World Cup 2025) आहे. मंगळवारी बर्मिंगहॅम येथे संपन्न झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत बीसीसीआयने मेगा-टूर्नामेंटसाठी बोली जिंकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council) या महत्त्वाकांक्षी स्पर्धेचे देश एका दशकाहून अधिक काळानंतर पुन्हा यजमानपद भूषवणार आहे.

महिलांचा एकदिवसीय विश्वचषक शेवटचा 2013 मध्ये भारतात आयोजित केला गेला होता. या विश्वचषकात मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजचा 114 धावांनी पराभव करून चॅम्पियन बनला होता. इतर तीन आयसीसी महिला स्पर्धांच्या यजमानांचीही आज घोषणा करण्यात आली. 2024 टी-ट्वेंटी विश्वचषक बांगलादेशमध्ये होणार ( T20 World Cup 2024 in Bangladesh ) आहे. 2026 चा टी-ट्वेंटी विश्वचषक इंग्लंडमध्ये ( T20 World Cup 2026 in England ) होणार आहे.

2025 मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. भारत पाचव्यांदा आयसीसी महिला स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. याआधीही भारताने चार वेळा आयसीसी महिला विश्वचषकाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून एकूण 31 सामने होणार आहेत.

2026 टी-20 विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार

ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे आयोजन इंग्लंडने केले आहे. जून महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत संघांची संख्या 10 वरून 12 होणार असून एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिला टी-20 विश्वचषक पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सीईओ क्लेअर कॉनर यांनी सांगितले की, 2017 मध्ये इंग्लंडला महिला विश्वचषकाचे यजमानपद मिळाले आणि इंग्लंड संघ चॅम्पियन बनला. लॉर्ड्सवर अंतिम सामना प्रेक्षकांनी खचाखच भरला होता आणि अशा क्षणी हीदर नाइटने ट्रॉफी उचलली हे मी विसरू शकत नाही.

महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात श्रीलंकेपासून होणार

महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये प्रथमच खेळली जाणार आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघांमध्ये एकूण 16 सामने होणार आहेत. यासोबतच आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कसं आहे महिलांचं 2024 ते 2027 मधील वेळापत्रक?

वेळापत्रकाचा विचार करता 2024 मध्ये बांग्लादेशमध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) पार पडणार आहे. यावेळी 10 संघ स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच पुढील वर्षी 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक (Womens World Cup 2025) भारतात खेळवला जाणार आहे. यावेळी 8 एकमेंकाविरुद्ध आमने-सामने असणार आहेत. तर एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच 2026 मध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 (Womens T20 World Cup 2026) इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. यावेळी 12 संघामध्ये 33 सामने खेळवले जाणार आहेत. 2027 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा (2027 Champions Trophy) खेळवली जाणार असून 6 संघामध्ये 16 सामने श्रीलंकेच्या भूमीत पार पडणार आहेत.

Back to top button