बेळगाव

जागतिक ग्राहक हक्‍क दिन : बेळगावात 4 हजार ग्राहकांचे 600 कोटींसाठी दावे

मोनिका क्षीरसागर

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : अंजर अथणीकर
जगप्रसिद्ध कंपनीच्या नूडल्समध्ये रबर सापडला…50 लाखांची ठेव पतसंस्था परतच देईना…अशा अनेक तक्रारी बेळगाव जिल्हा ग्राहक न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे तब्बल 600 कोटी रुपयांच्या ठेवींसाठी सुमारे चार हजार ग्राहकांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. यापैकी बहुतांशी तक्रारी बँका आणि पतसंस्थांच्या विरोधात आहेत.

जिल्हा ग्राहक न्यायालयाकडे गेल्या चार वर्षांत 4 हजार 500 तक्रारी दाखल झाल्या असून, यामधील 4 हजार तक्रारी केवळ बँका, पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवींसाठी आहेत. वाजवी किंमत आणि शुद्धता हे ग्राहकाचे हक्‍क आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्‍क मिळावा, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला. त्यानुसार जिल्हा ग्राहक न्यायालयाकडे ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो.

या हक्‍काबाबात दरवर्षी 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्‍क दिन म्हणून साजरा केला जातो. कोणतीही वस्तू खरेदी करताना वाजवीपेक्षा जास्त किंमत आकारणे, दर्जा योग्य नसणे, कालबाह्य झालेले खाद्य पदार्थ, औषधे विकणे याविरुद्ध तक्रार करता येते. कंपन्या नेहमी अपीलात ज्या कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक होते, त्या कंपन्या आपल्याविरुद्ध निकाल लागल्यास दंड भरण्याऐवजी उच्च न्यायालयात अपील करीत आहेत. तेथे पुन्हा वकील देणे ग्राहकांना खर्चिकद‍ृष्ट्या आणि वेळखाऊ असल्यामुळे ग्राहक उच्च न्यायालयात दाद मागेनासे झाले आहेत.

10 रुपयांपासून 50 लाखापर्यंत तक्रारी

बेळगावात न्यायालयाकडे नूडल्समध्ये रबर बँड सापडली तसेच 50 लाख रुपयांची ठेव बुडाल्याची तक्रारी दाखल करण्यात आली आहे. एका ग्राहकाला नूडल्सच्या पाकीटमध्ये रबर बँड सापडला. खाल्ल्याने त्यांना उलट्या सुरु झाल्या, अशी तक्रार दाखल झाली आहे. त्याचबरोबर एका क्रेडीट सोसायटीकडे 50 लाखांची ठेव पाच वर्षापासून अडकली आहे. मला त्याचा मानसिक धक्‍का बसला असून, औषधालाही माझ्याकडे पैसा नाही, अशी एका ग्राहकाची तक्रार आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT