नाशिकमधील एका जंगलात ट्रेकला गेल्यानंतर सनदी अधिकारी मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला. यात मिलिंद म्हैसकर जखमी झाले असले तरी त्यांना स्थानिकांनी हल्ल्यातून वाचवले, ही माहिती मनीषा म्हैसकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
म्हैसकर यांनी दुसरी एक पोस्ट करून मिलिंद म्हैसकर यांची प्रकृती सुधारली असून अनेकदा मधमाशांचा चावा हा फिजिओथेरपीचा भाग म्हणून वापरला जातो. तशीच काहींशी थेरपी आमच्यावर झाली आहे, अशी मिश्किल पोस्टही टाकली आहे.
नाशिकमधील अंजनेरी भागात म्हैसकर दाम्पत्य ट्रेकसाठी गेले होते. यावेळी मिलिंद म्हैसकर पुढे चालत होते. तर मनीषा म्हैसकर मागे होत्या. चालत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला.
त्यावेळी मिलिंद यांनी मागे वळून मनीषा यांना मागे जाण्यास सांगितले. हातवारे करून धावणाऱ्या मिलिंद यांना पाहून मनीषा यांना मधमाशांनी हल्ला केला आहे हे समजण्यास वेळ लागला. मनीषा यांच्याकडे असलेली स्टोल मिलिंद यांच्याकडे फेकली.यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडील शाली आणि जाकिटे त्यांच्याकडे फेकली. त्यामुळे त्यांचा चाव्यापसून बचाव झाला. एकाने तातडीने आग पेटवली आणि धूर तयार केला. त्यामुळे मधमाशा पळून गेल्या. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मधमाशांबाबत माहिती असल्याने त्याने प्रथमोपचारासाठी मदत केली.
मनीषा यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मिलिंद यांची प्रकृती आता छान आहे. मधमाशांना दंश केल्यामुळे आलेली सूज आणि वेदना कमी आल्या आहेत. मजेदार गोष्ट ही आहे की, मधमाशांनी चावल्यानंतर त्याच प्रभाव उतरला की त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागतात.
मधमाशीचे विषय हे तुमच्या मांसपेशींना आराम देते. तो भाग पुन्हा जिवंत झाला आहे, असे वाटते. (हे मला मिलिंद यांनी सांगितले) त्यामुळे मी इंटरनेटवर शोध घेतला. वैकल्पिक वैद्यकीय उपचारामध्ये एपिथरेरपी नावाची एक उपचार पद्धती आहे. त्यात वेगवेगळ्या औषधी उपचारात मधमाशीच्या विषाचा उपयोग केला जाते. ही कित्येक वर्षांपासून उपचार पद्धती अवलंबली जाते. सध्या मिलिंद ही एपीथेरपीचा अनुभव घेत आहेत. काही चांगल्या माणसांमुळे माझा या थेरपीपासून बचाव झाला. आता मला एपिथेरपीचे एक महागडे सत्र बुक करावे लागेल, असेही त्यांनी आपल्या पाेस्टमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचलं का?