स्नेहा वाघ आण मीरा जगन्नाथ  
Latest

मीराचं ऐकलं नाही की तिचा तिळपापड होतो : स्नेहा वाघ

स्वालिया न. शिकलगार

स्नेहा वाघ, सुरेखा कुडची, दादुस, तृप्तीताईंचा एका वेगळा स्वतंत्र ग्रुप तयार झालेला दिसतो आहे. हा गट म्हणजे घरातला C ग्रुप. तृप्ती ताई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A च्या आणि B च्या बाजूने नसलेला ग्रुप. तर आज याच ग्रुपमध्ये चर्चा रंगणार आहे ज्यामध्ये स्नेहा वाघ यांना सांगताना दिसणार आहे. वाघ म्हणते- मीरा मला सांगत होती, त्या पेंटमध्ये पाणी टाकुया. आता तो ऑइल पेंट त्यात पाणी कसं मिक्स होणार. आणि तिचं नाही ऐकलं तर तिचा तिळपापड होतो. आणि त्यांच्यासोबत देखील तेच झालं तिचं. आणि ती स्वत:चे नियम बनवते हे खरं आहे.

sneha wagh

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी "जिंकू किंवा लढू" हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले. या साप्ताहिक कार्याच्या अंतर्गत उपकार्य सदस्यांना देण्यात येणार आहेत, असे देखील सांगितले.

"माझे मडके भरी" हे पहिले उपकार्य अक्षय आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे रद्द करण्यात आले. बिग बॉस यांनी सदस्यांना ताकीद देखील दिली अशाप्रकारच्‍या कृत्याचा ते निषेध करतात. आज नवा दिवस… बघूया आज बिग बॉस सदस्यांना कोणता नवा टास्क देणार.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घोषित केले आहे. घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही. त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

आदेश येताच सदस्य एकावर एक मजेदार वाक्य करण्यास सुरुवात केली. गायत्री आणि तृप्ती देसाई यांनी वाक्य टाकायला सुरुवात केली. तृप्ती म्हणाल्या हारे हारे हारे… तर गायत्री म्हणाली 'जे वापरणार बेड त्यावर तृप्तीताई म्हणाल्या आमची डायरेक्ट पडणार रेड" आता सदस्यांना हे फर्निचर कसे मिळणार ? कुठला नवा टास्क बिग बॉस यांना देणार ? बघूया आजच्या भागामध्ये.

बघूया आज बिग बॉस मराठीच्या काय काय होतं ? बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT