BBM : माझे मडके भरी टास्कवर रंगणार कॅप्टन्सी पद | पुढारी

BBM : माझे मडके भरी टास्कवर रंगणार कॅप्टन्सी पद

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या -BBM घरात आज नवा टास्क रंगणार आहे- “माझे मडके भरी”. या टास्कसाठी देखील सदस्य दोन ग्रुप्समध्ये विभागले जाणार आहेत. याच मुद्द्यावरून आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. मीनल, विकास, सोनाली आणि आविष्कारमध्ये. ज्यामध्ये BBM मध्ये कॅप्टन्सी टास्कसाठी उमेदवारी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांच्या बोलण्यावरून समजते.

bbm
bbm

या संभाषणात मीनल सांगताना दिसणार आहे. “आता जो टास्क आहे. त्यामध्ये देखील दोन ग्रुप्स असणार आहेत. यानंतर कॅप्टन्सी टास्क होणार. ज्यामध्ये दोन उमेदवार निवडले जाणार. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची. कारण तसंही त्याला डील करायला खूप आवडत.

bbm
bbm

त्याला सांगायच की, मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार. फक्त पुढच्या कॅप्टन्सी टास्कसाठी तुम्ही माझं नावं देखील द्या. म्हणजे एक त्यांच्या ग्रुपमधला आणि एक आपल्या ग्रुपमधला अशी बरोबर कॉम्पटिशन होणार.

विकासचं म्हणण पडलं-उत्कर्षला जर डील दिली तर एक तर तो नाही म्हणेल पण जर तो हो म्हणाला तर त्याला शब्द पाळावाच लागेल. कारण त्याला डबल ढोलकी म्हणून नावं आहे आता already.

बघूया पुढे काय टास्कमध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Back to top button