नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसांपासून शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे.
सुनील भानुदास बोरसे हा कैदी गेल्या काही दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो कंटाळला होता. परिणामी त्याने कारागृहातील जिन्याने शौचालयाच्या छतावर जाऊन चादर फाडून त्याची दोरी बनवून खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना कारागृह कर्मचारी व अधिकाऱ्यांचा लक्षात येतात त्यांनी या कैद्याला हटकले. दरम्यान या घटनेप्रकरणी कारागृहाचे कर्मचारी शेख युनूस सांडू यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे व सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक हांडोरे या करीत आहे.