नाशिक : गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारले, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न | पुढारी

नाशिक : गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारले, नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वैतरणा डॅमजवळील राजाराम खातळे यांच्या शेताजवळ एका अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, धारगाव येथील पोलिसपाटील लक्ष्मण खातळे यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास वैतरणा डॅमजवळ एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात मारेकर्‍याने गळ्यावर तीष्ण हत्याराने जिवे ठार मारले. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वैतरणा डॅमकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला शेताच्या कोपर्‍यावर नेऊन मृतदेह फेकला.

मृतदेहावर प्लास्टिकच्या गोण्या टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक कविता फडतरे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. पोलिस हवालदार बिपीन जगताप, संतोष दोंदे, शीतल गायकवाड, दराडे आदी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button