पुढारी ऑनलाईन डेस्क : दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. आसाम रायफल्स ने ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या टेक्निकल आणि ट्रेड्समन पदांसाठी भरतीची नोटीफीकेशन निघाली आहे. यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसह आयटीआय आणि बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोंबर २०२१ आहे. अर्ज करण्यासाठी या assamrifles.gov.in वेबसाईटवर माहिती घेऊ शकता.
अर्ज करण्याची तारीख– ११ सप्टेंबर २०२१
अर्ज करण्याची अंतिम तारीख – २५ ऑक्टोबर २०२१
फी भरण्याची तारीख – २५ ऑक्टोबर २०२१
परीक्षा तारीख– १ डिसेंबर २०२१
दहावी पास, मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयसह किंवा मान्यताप्राप्त विद्यालयातून बारावीची परीक्षा पास.
उमेदवाराचे वय १८ ते २३ असावे
अर्ज करण्यासाठी 'फी'
ग्रुप बी पोस्टसाठी- २००
ग्रुप सी पोस्टसाठी- १००
उमेदवार ऑनलाईन च्या माध्यमातून परिक्षा फी भरु शकतात.
उमेदवारांची निवड PST, PET आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. या पध्दतीन आसाम रायफल्स मध्ये भरती प्रक्रिया होणार आहे.