उच्च प्रतीची ज्ञानलालसा हे या राशीचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचा सतत शोध व प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणे हे आपल्या राशीचे वैशिष्ट्य आहे. आपल्यावर उच्च ध्येयाचे, थोर विचारांचे व तत्त्वज्ञानाचे संस्कार झालेले असतात. संशोधन कार्यात, शास्त्रीय संशोधनात कुंभ व्यक्ती विशेष आढळून येतात. प्रामाणिकपणा हे कुंभ राशीचे विशेष वैशिष्ट्य आहे.
आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. दोन महिने वगळता संपूर्ण वर्ष शनी बाराव्या स्थानात आहे. ही शनीची प्रतिकूलता आहे, साडेसाती सुरूच आहे. त्यामुळे शंभर टक्के सर्व गोष्टी सुरळीतपणे पार पडतील अशी शक्यता नाही. मात्र, गुरू अनुकूल आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने फार मोठ्या टोकाच्या प्रतिकूल गोष्टी घडणार नाहीत. फक्त आरोग्याच्या संदर्भात जागरूक राहण्याची गरज आहे. मागच्या वर्षीपेक्षा हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. आपल्या विचारांची दिशा भटकणार नाही याची काळजी घ्यावी. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. सतत एखाद्या गोष्टीची चिंता करू नये. सतत करत राहणार्या चिंतेचा प्रभाव तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. आपल्याला साडेसाती सुरू आहे. ही साडेसाती 23/02/2028 रोजी संपणार आहे. यामुळे आपण सावध व संयमी राहणे हे जास्त योग्य ठरेल. प्रत्येक बाबतीत जागरूक राहणे हे योग्य ठरेल.
यावर्षी गुरू प्रथमस्थानात आहे. हा गुरू प्रथमस्थानात दि. 12/04/2022 पर्यंत आहे. दि. 12/04/2022 पर्यंतचा गुरू तुमचा उत्साह वाढविणार आहे, उमेद वाढविणार आहे. ज्या संधीची आपण वाट पाहत होता ती संधी आपणाला लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दि. 12/04/2022 पर्यंतच्या कालखंडात व्यवसायाच्या संदर्भातील व आर्थिक प्रश्नाच्या संदर्भातील जे निर्णय घ्याल ते बरोबर येतील. शनी बाराव्या स्थानात असल्यामुळे थोडे औदासिन्य राहण्याची शक्यता आहे. काही वेळा मन:स्वास्थ्य जाण्याची शक्यता आहे. परंतु, कुंभ व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक टोकाचा त्रास होणार नाही.
खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीनेविशेष अनुकूल आहेत.
दि. 01/04/2022 ते दि. 06/08/2022
दि. 01/09/2022 ते दि. 14/09/2022
दि. 01/11/2022 ते दि. 31/12/2022
सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे आपणाला खालील कालखंडात काळजी घ्यावयास हवी.
दि. 15/01/2022 ते दि. 12/02/2022
दि. 27/02/2022 ते दि. 07/04/2022
व्यवसाय व आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. व्यवसायातील घडामोडींकडे लक्ष देऊ शकाल. डॉक्टर्स, नर्सेस या क्षेत्रातील व्यक्तींना देखील हे वर्ष व्यवसायाच्या दृष्टीने चांगले राहील. सध्या आपली साडेसाती सुरू आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे व्यवसायातील मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करावी. व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा व्यवसायाच्या दृष्टीने व आर्थिक लाभाच्या दृष्टीने अधिक चांगला ठरणार आहे.
दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात व्यवसायाची उलाढाल होईल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा व्यवसायाची शाखा सुरू करायची आहे त्यांना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. साडेसाती सुरू आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना खूप जबाबदारी हवी. बाजारपेठेचा सांगोपांग अभ्यास करून व्यवहार करावयास हरकत नाही. दि. 12/04/2022 नंतर गुरू प्रत्यक्ष धनस्थानातच जात आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा गुरू विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व शेअर्समध्ये जे लोक आहेत त्यांनी चौफेर अभ्यास करून व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.
खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभासाठी चांगले आहेत.
दि. 01/01/2022 ते दि. 25/02/2022
दि. 28/04/2022 ते दि. 05/08/2022
दि. 01/09/2022 ते दि. 23/09/2022
दि. 01/01/2022 ते दि. 31/12/2022
नोकरी
कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. साडेसाती सुरूच आहे. परंतु, गुरू अनुकूल असल्यामुळे अपेक्षा इतकी नाही. परंतु, सर्वसामान्यपणे नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला समाधानकारक वातावरण आढळून येईल. आपण बेकायदेशीर कामापासून दूर रहाणे योग्य ठरेल. नोकरीतील प्रत्येक निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. कर्मचारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास निराशावादी होऊ नये. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: पार पाडावीत. दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात नोकरीत बढतीची शक्यता आहे. पगारवाढीची शक्यता आहे. साडेसातीमुळे प्रमोशन मागे-पुढे होऊ शकते. परंतु, बढती मिळण्याची, पगार वाढ होण्याची, काहींना नवीन नोकरी लागण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षी बढतीची शक्यता विशेष आहे. पगारवाढीचीही शक्यता आहे. नोकरीतील व्यक्तींना हे वर्ष स्वास्थ्याचे आहे. आरोग्य चांगले राहील. ज्या बढतीची वाट आपण पाहत होता ते बढतीचे योग दि. 12/04/2022 नंतर आहेत. यावर्षी तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येऊ शकणार नाही.
खालील कालखंड नोकरीतील व्यक्तींना अनुकूल आहेत.
दि. 01/01/2022 ते दि. 25/02/2022
दि. 15/04/2022 ते दि. 26/06/2022
दि. 11/08/2022 ते दि. 25/10/2022
प्रॉपर्टी
प्रॉपर्टी, गुंतवणूक यासाठी हे वर्ष चांगले आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यामुळे प्रॉपर्टीचे व्यवहार करणे तुम्हाला शक्य होईल. यावर्षी तुमचे प्रॉपर्टीच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागणार आहेत. हे वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी मिळण्याचे आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व गुंतवणुकीच्या क्षेत्रातही तुम्हाला यश मिळेल. फ्लॅट, प्लॉट, बंगला यामध्ये मनासारखी जागा मिळेल. ज्यांचे गाडीचे स्वप्न आहे तेही स्वप्न यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपले स्वत:चे वाहन असावे हे स्वप्न पूर्ण होईल.
खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत.
दि. 01/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 01/09/2022 ते दि. 24/09/2022
दि. 19/10/2022 ते दि. 29/12/2022
संततिसौख्य
संततिसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना समाधानकारक आहे. मुला-मुलींची प्रगती होईल. मुला-मुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुला-मुलींचे परीक्षेतील सुयश, शाळा, कॉलेजमधील प्रवेश व परीक्षेतील यश, नोकरीच्या दृष्टीने संधी या दृष्टीने दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड अधिक चांगला आहे. एकूणच संततिसौख्याच्या दृष्टीने काही गोष्टी अनुकूल घडतील. मुला-मुलींची प्रगती समाधानकारक असेल.
खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने विशेष करून यशदायक ठरतील.
दि. 06/03/2022 ते दि. 24/03/2022
दि. 28/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 02/07/2022 ते दि. 06/08/2022
दि. 13/11/2022 ते दि. 27/12/2022
वैवाहिक सौख्य
कुंभ राशीच्या मुला-मुलींचे विवाह जमणे व विवाह होणे या दृष्टीने व शुभ कार्याच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे. संपूर्ण वर्षभर गुरूची अनुकूलता आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहे. प्रतिकूल गोष्टी कमी घडतील. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. कुंभ राशीच्या विवाहेच्छू मुला-मुलींचे विवाह यावर्षी जमणार आहेत व होणार आहेत. विवाह होण्याच्या दृष्टीने व एकूणच शुभ कार्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे.
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने खालीलकालखंड अनुकूल आहेत.
दि. 12/02/2022 ते दि. 31/03/2022
दि. 14/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 19/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 01/09/2022 ते दि. 24/09/2022
दि. 18/10/2022 ते दि. 29/12/2022
प्रवास
प्रवास, तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने कुंभ व्यक्तींना हे वर्ष अत्यंत समाधानकारक आहे. परदेश प्रवासाचे योग येतील व प्रवास सुखकर होतील.खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने अनुकूल जातील. कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष प्रवासासाठी अत्यंत चांगले आहे. यावर्षी अनेक वेळा प्रवासाच्या तीर्थयात्रेच्या संधी चालून येतील. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. हे वर्ष प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत असामान्य असे आहे. कल्पनेत नसताना काहींना परदेशाच्या संधी मिळतील. काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशाच्या संधी मिळतील. विशेष म्हणजे यावर्षी प्रवासात कोणत्याही अडचणींना सामना देण्याची वेळ येणार नाही. दि. 01/04/2022 ते दि. 06/08/2022 दि. 18/10/2022 ते दि. 29/12/2022
प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता
सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, राजकीय या क्षेत्रांत प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. दि. 12/04/2022 पूर्वीच्या काळात आपणाला आपल्या कार्यक्षेत्रात सुसंधी मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. प्रत्यक्ष अधिकार, मानसन्मान, प्रतिष्ठा या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड अधिक चांगला आहे. हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना कर्तृत्वाला संधी मिळणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासाच्या बळावर व धाडसामुळे यावर्षी तुम्ही सार्वजनिक कार्यात आघाडी घ्याल.
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने अनुकूल जातील.
दि. 12/02/2022 ते दि. 14/03/2022
दि. 14/04/2022 ते दि. 15/05/2022
दि. 20/05/2022 ते दि. 15/10/2022
दि. 16/11/2022 ते दि. 16/12/2022
सुसंधी
सुुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने व अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगले आहे. विशेषत: दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा अधिक चांगला आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. नवा मार्ग दिसेल. यावर्षी तुमची वाटचाल योग्य दिशेने सुरू राहणार आहे. साडेसातीच्या सुरुवातीमुळे कमी-अधिक मानसिक त्रास जाणवला तरीसुद्धा यश मिळण्याच्या दृष्टीने फार अडचणी येणार नाहीत. हे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींना चांगली संधी मिळण्यासाठी फार चांगले आहे. यावर्षी तुम्हाला आतापर्यंत जी संधी मिळाली नव्हती ती संधी मिळणार आहे. तुमचे अनुभवाचे क्षितीज व्यापक होणार आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. तुम्ही आपली मते व आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. यावर्षी आपली चौफेर प्रगती होईल. तुम्हाला अनेकांची साथ लाभेल.
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धीच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 07/03/2022 ते दि. 06/08/2022
दि. 21/08/2022 ते दि. 20/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 09/12/2022
सारांश
कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. साडेसातीमुळे काही कामांमध्ये विलंब होईल, काही अडचणी येतील. विशेषत: मानसिक एकाग्रता राहणे हे अवघड होईल. काहींचे लक्ष आध्यात्मिक क्षेत्रात व धार्मिक क्षेत्रात राहील. खर्च वाढतील; पण ते योग्य कामासाठी असतील. संपूर्ण वर्षभर गुरू अनुकुल आहे. त्याचा फायदा संततिसौख्य व वैवाहिक सौख्याला होईल. घरात मंगल कार्य व शुभ कार्य घडू शकते. दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढू शकते. उधारी, येणे वसूल होऊ शकते. नोकरीत पगारवाढ होईल. काहींना बढती लाभेल. प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. साडेसाती असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात फारसा धोका पत्करू नये. वाहने चालवताना प्रवासात जागरूकता हवी. फार मोठे धाडस करताना व शेअर्सचा व्यवसाय करताना, प्रॉपर्टी खरेदी करताना अधिक जागरूकता व सावधगिरी बाळगावी. साडेसाती असली तरी गुरू अनुकूल असल्यामुळे फार काळजी करण्याचे कारण नाही.
– प्राचार्य रमणलाल शहा