छोट्या पडद्यावरची आघाडीची अभिनेत्री आणि लोकप्रिय टीव्ही सीरियल पवित्रा रिश्ता (Pavitra Rishta) फेम अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरचं विवाहबंधनात अडकणार आहे. अंकिता आपला बॉयफ्रेंड विकी जैन (Ankita Lokhande-Vicky Jain) याच्याशी ती लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
अलिकडेचं अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा, अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल, रणबीर कपूर आणि अलिया भट लवकरचं बोहल्यावर चढणार याची जोरदार चर्चा सूरू असतानाचं अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) ही बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) याच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन(Ankita Lokhande-Vicky Jain) डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत.
अंकिता आणि विकी तब्बल तीन वर्षे रिलेशनशीप मध्ये आहेत. नुकतचं एका पार्टीमध्ये किस करतानाचा फोटो सोळस मीडियारवर व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी तिने विकीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन तिने त्याचे आभार मांडले होते.
अंकिता लोखंडे तिच्या लव्हलाईफमुळे नेहमी चर्चेत असते. सुशांतसिंहशी नातेसंबंध बिघडल्यानंतर तिच्या आयुष्यात उद्योगपती विकी जैन आयुष्यात आला. दोघांचे रिलेशन तीन वर्षे चालले आणि अखेर त्यांनी लग्नाचा विचार केला आहे. लवकरचं अंकिता आणि विकी लग्न करणार आहेत. लोकप्रिय हिंदी मालिकेतील अंकिता लोखंडे आणि सुशांतसिंह राजपुत या दोघांनी पती(मानव)-पत्नी (अर्चना) ची भूमिका केली होती. या दोघांची जोडी खूप गाजली.
अंकिताने विविध मालिकां, चित्रपटात अभिनय केला आहे. पण तिची पवित्र रिश्ता या लोकप्रिय हिंदी मालिकेतील तिची अर्चना ही भूमिका खूप गाजली. अल्पावधीत तिने आपला अभिनय क्षेत्रात ठसा उमटवला आहे. आता अंकिताच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची आतुरता लागली आहे.
हेही वाचा