

'स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज' या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने ( Prajakta gaikwad) तमाम रसिकांच्या मनात अभिनयाच्या जोरावर घर केले आहे. तिची येसूबाईची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता प्राजक्ता गायकवाड ( Prajakta gaikwad) एका नव्या 'गाण्यातून चाहत्याच्या भेटीस येत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असून सध्या तिच्या 'साजनी' गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे.
याआधी ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात नॉर्मल लुकमध्ये दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच, ६ ऑक्टोबरला या गाण्याचा टिझर लाँच झाला असून आता हे गाणं चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहे.
प्राजक्तासोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार असून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. 'साजनी' हे सिद्धांतच्या स्वप्नातील गाणं आहे. हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातलं, स्वप्नातलं गाणं असल्याने प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच भावेल यांत शंकाच नाही. असे प्राजक्ताने म्हटले आहे.
या गाण्याची निर्मिती शिवाजी जवळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केले आहे. हे गाणे धैर्य आणि तेजस यांनी स्वरबद्ध केले असून याची संकल्पना निर्माते शिवाजी जवळे यांची आहे. या गाण्याला धीरज भालेराव यांनी दिग्दर्शित केले असून याचे डिझायनिंग शलाका बोजवार यांनी केले आहे.
तर सीमा दारवटकर यांनी मेकअप आर्टिस्टची भूमिका उत्तमरीत्या पेलवली. बाळा कांबळे यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना वेड लावले आहे. याशिवाय प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून अॅक्टिव्ह असते.
'साजनी' या गाण्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली की, 'हे गाणं अतिशय सुंदर आहे. ऐकायला खरंच खूप छान आहे याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. आणि हे गाणं जर सकाळी ऐकलं तर खूप फ्रेश वाटेल कारण या गाण्याचे म्युझिक खूप प्लेजेंट आहे.'
हेही वाचलंत का?