बिग बॉस मराठी : मी नाही तुटणार : मीनल शाह | पुढारी

बिग बॉस मराठी : मी नाही तुटणार : मीनल शाह

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल दुसर्‍या वाईल्ड कार्ड सदस्याची म्हणजेच नीथा शेट्टी – साळवी हिची एंट्री झाली. ती घरामध्ये जाण्यापूर्वीच चर्चा रंगली होती की, कोणत्या ग्रुपला ती जॉइन होणार. काल महेश मांजरेकर यांनी विचारले असता तिने विकास आणि मीनल शाह यांची चांगले स्पर्धक म्हणून नावे घेतली. आता घरात गेल्यानंतर नीथाविषयी चर्चा चांगलीच रंगलेली दिसून येते आहे. आज विकास, मीनल शाह, विशाल आणि सोनाली विविध विषयांवर चर्चा करताना दिसणार आहेत. शाह म्हणाली- मी खरं बोलणार आहे. मी तर सांगितलं की, उत्कर्षने ट्रायचं नाही केलं तुझ्या कॅप्टन्सीसाठी. आमच्या हातात होतं तुला ते पद मिळावं आणि मिळालं असतं.  आपण तेच बोलायच जे मनात आहे. पण, हेच आहे की ते तोंडावर बोलू नाही शकतं. शाह पुढे म्हणाली- माझा हात आणि पाय दुखतो आहे. सदस्तोय काहीतरी तोडायचा प्रयत्न करत आहेत. पण मी नाही तुटणार.”

विकासचे म्हणणे आहे, थोडीशी insecurity झाली आहे. आणि त्यांना कळालं आहे की नीथा स्वत:हून यांच्याकडे गेली, आदिशपण यांच्याकडे गेला. मग होतय काय बाहेर ? कळलं का… सोनाली म्हणाली, गायत्री काय म्हणते माहिती आहे का… ही स्नेहा कॅप्टन्सीमध्ये स्वत:बद्दल तीन वाक्य बोलणार आहे किती त्यांची बाजू घेते हे बघायचे आहे मला.

बघूया आज अजून काय काय घडले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button