Latest

Ankita Lokhande : अंकिता- विकी जैनची बिग बॉस १७ मध्ये दमदार एन्ट्री

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande ) आणि विकी जैन ही सुपरहिट जोडी आता दमदार असलेल्या बिग बॉस १७ मध्ये दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरात या पॉवर कपलने एन्ट्री घेतल्याने प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सुरुवातीला याबद्दलची अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण आता ही माहिती कम्फर्म झाली आहे.

संबधित बातम्या 

रिअॅलिटी बिग बॉस १७ शोमध्ये अंकिता आणि विकी यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. 'पवित्र रिश्ता' मधील अर्चना या प्रतिष्ठित भूमिकेसाठी आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'मधील झलकारी बाईच्या निर्भीड भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अंकिताने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अंकिताचा पती विकी जैन तिला चित्रपटांमध्ये अधिक शक्तिशाली भूमिका घेण्यास प्रोत्साहित करत असतो.

बिग बॉसच्या जगात प्रवेश करताना हे पॉवर कपल शोमध्ये उठून दिसणार आहे. चाहते ही लाकडी जोडी बघण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस १७ चा प्रीमियर १५ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असून अंकिता आणि विकीच्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांची उपस्थिती शोमधील या सीझनला आणखी आकर्षक बनवणार आहे. बिग बॉस १७ च्या घरात या पॉवर जोडीच्या रोमांचक प्रवास पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अंकिता तिच्या पुढील प्रोजक्टच्या रिलीज होण्याची तयारी करत आहे, अंकिता विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका रणदीप हुडासोबत साकारणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT