Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने पुन्हा केलं लग्न, लिपलॉक व्हायरल (Video)

Ankita-Vicky
Ankita-Vicky

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री (TV Actress) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने तिचा पती विकी जैन सोबत पुन्हा लग्न केले आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अंकिता लोखंडेने वयाच्या ३८ व्या वर्षी दुसरा विवाह केला आहे. या व्हिडिओत दोघे लिपलॉक करताना दिसत आहेत. (Ankita Lokhande)

अंकिता लोखंडेने गुलाबी रंगाची शिमर साडी नसलीय. तिचा पती विकी जैनसमोर ती उभी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी विकी जैन फॉर्मल ड्रेसमध्ये गुडघ्यावर बसून अंकिताला फुलांचा गुच्छ देत प्रपोज करत आहे. या जोडप्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. व्हिडिओमध्ये फादर देखील या कपलजवळ उभे असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना अंकिता लोखंडेने लिहिले की, "आम्ही पुन्हा लग्न केले." चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अंकिताच्या या पोस्टला लाईक करत कमेंट करत आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी एकमेकांना दीर्घकाळ डेट केले. त्यानंतर १४ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले. विकी जैन हा बिझनेसमन आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news