Ankita Lokhande : अंकिता-विकीने नव्या घरात साजर केलं एक वर्ष

ankita-vicky
ankita-vicky

पुढारी ऑनलाईन डेस्क : घर हे नेहमीच सगळ्यांसाठी खास जागा असते. प्रत्येकाला त्याचं घर हे तितकच खास असत फक्त चार भिंती नसून अनेक भावना आणि माणसाची लगबग असलेली ही खास जागा असते. नुकतंच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने तिच्या या खास घरातलं एक वर्ष साजर केलं. अंकिताने तिच्या सोशल मीडियावर पती विकी जैनसोबत फोटो शेअर केले आहेत. तिने खास कॅप्शन दिलेय, "आमच्या आनंदी जागे मधल खास एक वर्ष ! ✨वेळ हा अगदीच पटकन निघून जातो. (Ankita Lokhande)

मला अजूनही आठवतंय जेव्हा तू आमच्यासाठी हे घर विकत घेतलंस तेव्हा तू किती उत्साही आणि आनंदी होतास कारण हे आमचे मुंबईतील पहिले घर होते. आणि शेवटी ज्या दिवशी आम्ही शिफ्ट झालो आहाहा!! किती सुंदर आणि संस्मरणीय होता तो दिवस. ते 10-06-22 होते आणि काल आम्ही आमच्या आनंदी जागेचे एक वर्ष पूर्ण केले ✨ संपूर्ण वर्ष !!! खूप भावना आणि खूप सुंदर भावना आणि खूप प्रेम आणि आठवणी असलेला हा रोलर कोस्टर आहे.. जेव्हा मी आमचे घर पाहते तेव्हा मला खूप कृतज्ञ वाटते…
म्हणून धन्यवाद मला आमचे घर दिल्याबद्दल ज्याला आम्ही आमचे आनंदी ठिकाण म्हणतो ! प्रिय घर ?"

मणिकर्णिका अभिनेत्री तिचा आनंद या खास पोस्ट मधून शेयर करते. "आम्ही इथे शिफ्ट होऊन एक वर्ष झाले आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हे घर आमच्यासाठी भाग्यवान आहे. आम्ही येथे अशा सुंदर आठवणी बनवल्या आहेत आणि येणाऱ्या वर्षासाठी मी उत्सुक आहे.

तिचे पती विकी जैन यानेही सांगितले, "मला अंकिताला स्वतःचे घर द्यायचे होते. गेल्या वर्षभरात तिने हे घर आपलंस घर केलं आहे. हे आपले छोटेसे जग आहे, आपला स्वर्ग आहे."

अंकिता रणदीप हुड्डासोबत स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट करत आहे. ज्याचा टीझर आधीच प्रदर्शित झाला आहे. तिचे चाहते तिला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news